समोर आलं अभिनेत्रीचं दुःख, लग्नानंतर काश्मीरपासून झाली होती दूर

समोर आलं अभिनेत्रीचं दुःख, लग्नानंतर काश्मीरपासून झाली होती दूर

लग्नानंतर मला जाणीव झाली की गोष्टी किती पटकन बदलल्या. आता किती गोष्टी मी करू शकत नाही आणि अनेक गोष्टींचा हिस्साही मी राहिलेली नव्हते.

  • Share this:

मुंबई, 06 ऑगस्ट- टीव्ही अभिनेत्री एकता कौलने कलम 370 रद्द केल्याबद्दल आनंद व्यक्त केला. एकता ही मुळची काश्मिरी आहे. पण अभिनेता सुमित व्यासशी लग्न केल्यामुळे ती नॉन- काश्मिरी झाली. अशात कलम 370 रद्द केल्याने तिच्या आनंदाला पारावा उरला नाही. एकता म्हणाली की, ‘मला बाबांनी सकाळी उठवलं आणि टीव्ही पाहायला सांगितला. ही बातमी पाहून मला फार आनंद झाला. पुन्हा एकदा ते माझं राज्य झालं. सरकारच्या निर्णयामुळे आम्ही सगळेच आनंद साजरा करत आहोत.’

एकता पुढे म्हणाली की, ‘लग्नानंतर मला जाणीव झाली की गोष्टी किती पटकन बदलल्या. आता किती गोष्टी मी करू शकत नाही आणि अनेक गोष्टींचा हिस्साही मी राहिलेली नव्हते. सगळ्या गोष्टी अचानक वाईट पद्धतीने बदलल्या. मला नेहमी काश्मिरात जमीन विकत घ्यायची होती. मला नेहमीच तिथे परत जायचं होतं. पण लग्नानंतर सगळ्या गोष्टी अचानक बदलल्या. मी काश्मिरचा हिस्सा राहिली नव्हती. पण आता मला आशा आहे की गोष्टी बदलतील.’

कलम 370 नुसार काश्मिरच्या मुलींनी बाहेरील राज्यातील मुलांशी लग्न केलं तर त्यांची राज्याची नागरिकता जायची. पण आता कलम 370 हटवल्यामुळे काश्मिरी महिला भारत किंवा जगभरातील कोणत्या पुरुषाशी लग्न करू शकते. यामुळे त्यांचं नागरिकत्त्व जाणार नाही. एकताचा जन्म काश्मीरमध्ये झाला होता. 2018 मध्ये तिने अभिनेता सुमित व्यासशी लग्न केलं.

दरम्यान, जम्मू- काश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतर सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलं आहे. सर्वसामान्य नागरिक असो किंवा सेलिब्रिटी प्रत्येकजण या निर्णयाचीच चर्चा करताना दिसत आहे गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यसभेत हा प्रस्ताव मांडला. या निर्णयाचा काँग्रेससह अन्य विरोधी पक्षाने याला कडाडून विरोध केला. बॉलिवूडमधूनही यावर वेगवेगळ्या रिअॅक्शन येत आहेत.

बॉलिवूड अभिनेता म्हणाला, 'आता काश्मिरी मुलीशी लग्न करेन आणि...'

Article 370 ने भडकल्या पाकिस्तानी अभिनेत्री, म्हणाल्या- ‘स्वर्ग जळतोय आणि आपण..'

Article 370 वर तीनही खानांची 'अळीमिळी गुपचिळी'

‘ये हिंदुस्तान चुप नहीं बैठेगा’ या 11 डायलॉगने काढली पाकची इज्जत

SPECIAL REPORT: अमित शाह आणि भाजप विरोधकांच्या फार पुढे गेले!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 6, 2019 03:10 PM IST

ताज्या बातम्या