मराठी रंगभूमी दिन

6 नोव्हेंबर, मुंबई -5 नोव्हेंबर हा दिवस 'मराठी रंगभूमी दिन' म्हणून ओळखला जातो. मराठी रंगभूमीने रसिकांना खूप काही दिलं आहे. अशी कोणती कारणं आहेत ज्यामुळे मराठी रंगभूमी वेगळी आणि उजवी ठरते, हे जाणून घ्यायचा केलेला प्रयत्न-नसिरुद्धीन शाह : मराठी रंगभूमी जिवंत रंगभूमी आहे. 'तुमचे सर्वात आवडते परफॉमन्स कोणते,'असं मला अमेरिकेत विचारलं होतं. तेव्हा त्यांना मी जी पाच नाटकांची नावं सांगितली ती पाचही नावं मराठी आहेत. श्रीराम लागू (आधे अधुरे), भक्ती बर्वे (तू फुलराणी), मोहन आगाशे (घाशीराम कोतवाल), चंद्रकांत काळे (बेगम बर्वे), निळू फुले (सखाराम बाईंडर) त्यांच्या इतका चांगला अभिनय मी आजपर्यंत तरी पाहिलेला नाही. सतीश आळेकर - मराठीच काय पण कोणत्याही रंगभूमीला मरण आहे, असं मला कधीच वाटत नाही. मराठीत प्रयोग व्हायला सुरुवात झाली आहे. निपुण धर्माधिकारी - मराठी रंगभूमी कधीच संपणार नाही. नाटकांची संख्या वाढलीय. एकामागोमाग एक नाटकं येत आहेत. कीर्ती शिलेदार - आम्ही आमच्यापरीनं काम केलं आणि करत आहोत. तरुण पिढी कढून काम करून घेत आहोत. आमच्या पुढच्या पिढीलाही कार्यप्रवृत्त केलं आहे. ती मुलं इथे हौसेने येत आहेत. संगीत रंगभूमी जोमाने चालेल हे यात वाद नाही. नीना कुलकर्णी - मला असं वाटतं की प्रत्येक मीडियमला आपापली अशी जागा आहे. मला असं वाटतं की यात सर्वात वरचं थिएटर आहे. कारण इथे तुम्हाला एक लाइव्ह एक्सपिरिअन्स मिळत असतो. मराठी नाटकांतून मला तसा भरपूर अनुभव आला आहे. जितेंद्र जोशी : तुम्हाला काही एक शे माणसं बघायला येत असतात. तेव्हा तुमच्याकडे एक जबरदस्त असं माध्यम आहे. आणि ते तुम्हाला कदाचित फॉलोही करत असतात. मग ते सिनेमा आसो की नाटक. जीव ओतून भूमिकेशी एकरूप होऊन काम करा.

आईबीएन लोकमत | News18 Lokmat | Updated On: Nov 6, 2008 10:07 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 6, 2008 10:07 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...