'या' अभिनेत्रीनं टाकलं बिग बी आणि खानांनाही मागे; भारतातल्या श्रीमंत सेलेब्रिटींच्या यादीत पहिल्यांदाच आलं महिलेचं नाव

'या' अभिनेत्रीनं टाकलं बिग बी आणि खानांनाही मागे; भारतातल्या श्रीमंत सेलेब्रिटींच्या यादीत पहिल्यांदाच आलं महिलेचं नाव

या सगळ्या यादीत अग्रक्रमावर आहे अभिनेत्री दीपिका पदुकोण. फोर्ब्स मासिकाच्या पाच श्रीमंतांच्या यादीत स्त्रियांमध्ये दीपिकाचा नंबर वन आहे. दीपिकाची 2018मधली कमाई 112.80 कोटी आहे.

  • Share this:

मुंबई, 28 डिसेंबर : फोर्ब्स मासिकानं नुकतीच श्रीमंत सेलिब्रिटींची यादी जाहीर केली. त्यात बाॅलिवूडच्या अभिनेत्रींनी मोठं यश मिळवलंय.

या सगळ्या यादीत अग्रक्रमावर आहे अभिनेत्री दीपिका पदुकोण.  फोर्ब्स मासिकाच्या पाच श्रीमंतांच्या यादीत स्त्रियांमध्ये दीपिकाचा नंबर वन आहे. दीपिकाची 2018मधली कमाई 112.80 कोटी आहे.

या यादीत आलिया भट 12वी ( 58.83 कोटी ), अनुष्का शर्मा 16वी ( 45.83 कोटी ), कतरिना कैफ 21वी ( 33.67 कोटी ), प्रियांका चोप्रा 49वी ( 18 कोटी ) आहेत. म्हणजे दीपिकानं या आघाडीच्या अभिनेत्रींनाही मागे टाकलंय. इतकंच काय तर ती आमिर खान, अमिताभ बच्चन आणि शाहरुख खान यांच्याही पुढे गेलीय.

तिच्या या कमाईत महत्त्वाचा भाग पद्मावत सिनेमाचा आहे. या सिनेमानं 302कोटींच्या वर कमाई केली होती.

11 वर्षांपूर्वी दीपिकानं ओम शांती ओम सिनेमातून सुरुवात केली. पद्मावत, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू इयर, बाजीराव मस्तानी, रामलीला, ये जवानी है दिवानी हे सहा सिनेमे 100 कोटींच्या घरात गेले. आज दीपिका एका सिनेमासाठी 10 कोटी रुपये घेते.

दीपिका पदुकोण लग्नानंतरही फिटनेसबाबत शिस्तबद्ध आहे. हेल्थविषयी दीपिका आजही तितकीच काळजी घेताना दिसते. लग्नानंतरही बॉलिवूडमध्ये दीपिकाला आपली छबी कायम ठेवायची असेल तर तिला फिट राहणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे दीपिकाला आपल्या डाएटसोबतच वर्कआऊटवर पण जास्त लक्ष देते.

लग्नानंतर दीपिकाने मेघना गुलझारचा 'छपाक' चित्रपट साईन केला आहे. लवकरच त्या चित्रपटाचं शूटिंग सुरू होणार असून 2019 पर्यंत चित्रपट रिलीज करण्यात येईल असं म्हटलं जात आहे.

PHOTOS: नागराजसाठी बिग बी पोहोचले थेट शिक्षकाच्या घरी आणि...

First published: December 28, 2018, 3:11 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading