कसा बनला 'सैराट'? उलगडणार निर्मितीचा प्रवास!

कसा बनला 'सैराट'? उलगडणार निर्मितीचा प्रवास!

झी टॉकिजने प्रेक्षकांच्या मनातील हीच उत्सुकता ओळखून 'सैराटच्या नावाने चांगभलं' हा माहितीपट तयार केलाय.

  • Share this:

19 एप्रिल : 'सैराट' हा सिनेमा रिलीज होऊन दोन वर्ष उलटली तरीही या सिनेमाची लोकप्रियता तसूभरही कमी झालेली नाही. मराठीतला हा माईलस्टोन सिनेमा नक्की कसा बनला असावा हा प्रश्न सगळ्यांच्याच मनात होता. झी टॉकिजने प्रेक्षकांच्या मनातील हीच उत्सुकता ओळखून 'सैराटच्या नावाने चांगभलं' हा माहितीपट तयार केलाय.

या माहितीपटातून सैराटच्या निर्मितीचा संपूर्ण प्रवास आपल्यासमोर उलगडणारे. 29 एप्रिलपासून सलग चार रविवार दुपारी 12 वाजता ही निर्मितीकथा आपल्यासमोर येईल. आकाश आणि रिंकूच्या ऑडिशनपासून सैराट कसा आकारत गेला त्याचं चित्रण या माहितीपटातून पहायला मिळेल. नुकत्याच एका खास पत्रकार परिषदेत सैराटचे दिग्दर्शक नागराज मंजुळे, आकाश ठोसर आणि रिंकू राजगुरू यांनी ही घोषणा केली.

First published: April 19, 2018, 12:16 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading