'हॅम्लेट'मधल्या सुमित राघवनचा लूक पाहिलात का?

'हॅम्लेट'मधल्या सुमित राघवनचा लूक पाहिलात का?

शेक्सपीअरचं गाजलेलं नाटक 'हॅम्लेट' आता मराठी रंगभूमीवर दाखल होणारे.त्यात मुख्य भूमिकेत आहे सुमित राघवन. सुमितचा या नाटकातला लूक बाहेर आलाय.

  • Share this:

17 एप्रिल : शेक्सपीअरचं गाजलेलं नाटक 'हॅम्लेट' आता मराठी रंगभूमीवर दाखल होणारे.त्यात मुख्य भूमिकेत आहे सुमित राघवन. सुमितचा या नाटकातला लूक बाहेर आलाय.महेश एलकुंचवारांच्या वाडा नाट्यत्रयीच्या यशस्वी प्रयोगांनंतर दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांनी हे शिवधनुष्य उचलण्याचा निर्णय घेतलाय.

या नाटकात अभिनेता सुमीत राघवन हा 'हॅम्लेट'ची मध्यवर्ती भूमिका साकारणार असून त्याच्याशिवाय समीर धर्माधिकारी, मुग्धा गोडबोले, मनवा नाईक असे तब्बल 18 कलावंत या नाटकात काम करताना आपल्याला दिसतील.

या नाटकाची निर्मिती झी मराठी करणार असून या नाटकाद्वारे सिनेमांप्रमाणेच नाट्यनिर्मितीतही झी पदार्पण करतेय. हे नाटक भव्य दिव्य रूपात मराठी रंगभूमीवर सादर करण्याचा निश्चय या सगळ्यांनी मिळून केलाय.

First published: April 17, 2018, 4:38 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading