'बोल्ड' प्रश्नावर सनी लिआॅन एेवजी आयोजकच भडकला, पत्रकारावर गेला धावून !

'बोल्ड' प्रश्नावर सनी लिआॅन एेवजी आयोजकच भडकला, पत्रकारावर गेला धावून !

लातूरमध्ये पत्रकाराने सनीला बोल्ड असल्याबद्दल प्रश्न विचारला असता सनी ऐवजी आयोजक तरुणाला भलताच राग आला आणि तो थेट पत्रकारावरच धावून गेला.

  • Share this:

31 मे : सनी लिआॅनच्या चाहत्या कोणत्या थराला पोहचेल याचा नेम नाही. लातूरमध्ये पत्रकाराने सनीला बोल्ड असल्याबद्दल प्रश्न विचारला असता सनी ऐवजी आयोजक तरुणाला भलताच राग आला आणि तो थेट पत्रकारावरच धावून गेला.

एका जिमच्या उदघाटनासाठी सनी लिआॅन लातुरात आली होती त्यादरम्यान पत्रकारांशी संवाद साधताना ती सर्व प्रश्नांची उत्तरे शांतपणे आणि हसत खेळत देत होती. याच वेळी IBN लोकमतचे लातूर जिल्हा प्रतिनिधी नितीन बनसोडे यांनी बोल्ड अभिनेत्री म्हणून ओळख याचे वाईट वाटते का ? असा प्रश्न सनीला विचारला असता सनीच्या शेजारी उभा असलेले आयोजक सचिन शेंडे यांना भलताच राग आला.

पत्रकारांसोबत संवाद सुरू असतानाच तो पत्रकाराच्या अंगावर धावून गेला आणि धक्काबुक्की केली. आयोजकाच्या सहकाऱ्यांनी त्याला बाजूला करून पत्रकारांची माफी माफी मागितली. त्यानंतर सनीने एका प्रश्नाचं उत्तर देऊन कार्यक्रम आटोपला.

First published: May 31, 2017, 5:24 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading