छोटे शेफ खवय्यांसाठी बनवणार चवदार पदार्थ

छोटे शेफ खवय्यांसाठी बनवणार चवदार पदार्थ

आजची मुलं अनेक गोष्टींमध्ये निपुण असतात आणि अशीच काही मुलं आम्ही सारे खवय्येमध्ये त्यांचं पाक कौशल्य दाखवणार आहेत.

  • Share this:

मुंबई, 20 डिसेंबर: सण समारंभ म्हटलं की घरामध्ये रेलचेल असते ती विविध पाककृती बनवण्याची. गोडधोड पदार्थ, चमचमीत, खमंग, खुसखुशीत पदार्थ बनवण्याची लगबग घराघरांत बघायला मिळते. दिवाळीमध्ये फराळाशिवाय प्रत्येक दिवशी काही तरी वेगळं आणि खास बनविण्याची इच्छा घरातील सुगरणींना असते. पण  वेगळं काय करायचं? यासाठी त्या विविध माध्यमं शोधत असतात. त्यातलाच एक शो 'आम्ही सारे खवय्ये'. आम्ही सारे खवय्येचा हा लज्जतदार प्रवास नुकताच ३००० भागांचा झाला. त्यानिमित्तानं यावेळी पदार्थ बनवायला येणार आहेत छोटे शेफ.

पूर्वी मुलं मैदानी खेळ खेळायचे, पण आत्ताच्या पिढीला मैदानी खेळांपेक्षा व्हिडिओ आणि मोबाईल गेम्समध्ये रुची असते. आजची मुलं अनेक गोष्टींमध्ये निपुण असतात आणि अशीच काही मुलं आम्ही सारे खवय्येमध्ये त्यांचं पाक कौशल्य दाखवणार आहेत.

आम्ही सारे खवय्ये कार्यक्रमाच्या किचनमध्ये छोट्या शेफचं स्वागत पुढील आठवड्यापासून होणार आहे. हे छोटे शेफ संकर्षणसोबत त्यांच्या आवडी-निवडींबद्दल गप्पा मारणार आहेत. तसंच चमचमीत पदार्थ बनवणार आहेत. एरवी भूक लागली की आईच्या नावाने हाका मारणारी बच्चेकंपनी यावेळी स्वत: चविष्ठ पदार्थ बनवून आपल्या आईला खिलवणार आहेत.

आम्ही सारे खवय्ये शो नेहमीच काही वेगळं करत असतो. नवरात्रीत मालिकेतल्या नायिका शोमध्ये आल्या आणि प्रत्येकीनं पदार्थ बनवले. शनाया, राधिका, मायरा, ईशा सगळ्यांनी मस्त पदार्थ बनवले आणि प्रत्येक भागात त्यांना सरप्राईझ मिळालं होतं.

लागिरं झालं जी या मालिकेमधील अभिनेत्री शीतल म्हणजेच शिवानी बावकर आली होती. जर्मन भाषेतून प्रपोज करताना संकर्षण आणि शिवानी मध्ये नेमकी काय गंमत घडली हे प्रेक्षकांना पाहायला मिळाली होती.

First published: December 20, 2018, 6:42 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading