News18 Lokmat

शाहरूखच्या सेल्फीमधली ही तरुणी कोण?

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Feb 2, 2017 05:32 PM IST

शाहरूखच्या सेल्फीमधली ही तरुणी कोण?

02 फेब्रुवारी : नुकताच शाहरूख खान पुण्यात आपल्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी गेला होता. तिकडे त्याच्यापेक्षा जास्त चर्चा दुसऱ्याच गोष्टीची झाली . ती म्हणजे सायमा हुसैन ही मुलगी. ती एक २१ वर्षाची मुलगी आहे, जी मूळची श्रीनगरची असून सिम्बॉयसिस इन्स्टिट्युट ऑफ डिझाईनची विद्यार्थिनी आहे. तर शिक्षणासाठी सध्या पुण्यात असते.

तर झालं असं की तो गेलेला पुण्याला आपल्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी. तिकडे त्याला भेटायला खूप चाहते आले. त्यांच्यासोबत त्याने फोटो काढले. ते त्याने पोस्ट केले. त्याला लाखो करोडोत लाईक्स आणि शेअर्स मिळाल्या. मात्र त्यापैकी एका सेल्फी या सोशल मीडियावर मोठा व्हायरल झाला . त्याचं कारण होती ही सायमा. सायमा अचानक अनेकांच्या टाईमलाईनवर दिसायला लागली. त्या मुलीच्या सौंदर्यावर 'नेटकर' फिदा झाले. तिच्याविषयी बोलू लागले.

चाहत्यांच्या त्या गर्दीत हिरवं टी-शर्ट घालून पहिल्या रांगेत उभी असलेली ती सगळ्यांच्या मनात घर करून गेली. सगळ्यांना तिच्याविषयी जाणून घ्यायचं होतं . सगळेच तिचा शोध घेत होते. एका वेबसाईटने तिच्याविषयी तर माहितीही काढली. तिला हा सगळा प्रकार अवाक् करून गेला. ती म्हणाली, 'मला या सगळ्याविषयी माझ्या मैत्रिणीनं सांगितलं. मी इंटरनेटवर वायरल झाल्याचं तिनेच मला सांगितलं. नंतर मला सर्वांकडून फोन आणि मेसेज यायला लागले. तोपर्यंत मला वाटत होतं की ती गंमत करत्येय. मग मी स्वत: चेक करुन पाहिलं तर ते खरंच होतं.'

ती पुढे म्हणाली की, 'शाहरूखचा तो इव्हेंट मॅनेज करण्यासाठी मी काम करत होते. मला इतक्या पुढे जाता येईल असं वाटलं नव्हतं पण आम्ही गर्दीतून पुढे गेलो.'

Loading...

सायमाने कॉलेजमध्ये फॅशन प्रोजेक्ट केलेत मात्र तिची मॉडेलिंगची आवड नाहीये. तिने तो विचार केला नाहीये. तिच्या 'चाहत्यांनीच' तिला ते सुचवलंय. याबाबत ती म्हणते ,'माझं ध्येय सध्या शिक्षण पूर्ण करणं आहे.' ती म्हणते की खtप लोk माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करताएत, मात्र त्यांच्याशी कसं वागावं ते मला कळत नाही. खरंतर हे सगळं बघून मी भारावून गेलेय. हे सगळं माझ्यासाठी अनपेक्षित आहे.'

असो, सायमा, तू मात्र फेमस झालीस.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 2, 2017 02:00 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...