News18 Lokmat

नवं वर्ष,नवे सिनेमे

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Jan 2, 2017 12:01 PM IST

नवं वर्ष,नवे सिनेमे

[wzslider]

02 जानेवारी : गेल्या वर्षीच्या सिनेमांचा लेखाजोखा तर आपण पाहिलाच . आत्ता आम्ही आणलाय तुमच्यासाठी आगामी सिनेमांचा खजिना . तुम्हीपण तुमच्या आवडत्या स्टार्सच्या नवीन चित्रपटांची वाट पाहतच असाल . यावर्षीसुध्दा मोठ्या स्टार्सचे सिनेमे तुमच्या भेटीला येत आहेत . पाहुयात कोण येतंय यावर्षी आपले सिनेमे घेऊन .

1.विशाल भारद्वाजचा सिनेमा 'रंगून' या 24 फेब्रुवारीला रिलीज होणारे. या चित्रपटात शाहिद कपूर आणि कंगना रानावत पहिल्यांदा एकत्र काम करताना पाहायला मिळणार आहेत.

2.सुभाष कपूर दिग्दर्शित 'जॉली एलएलबी-2' पुढील महिऩ्यात 10 तारखेला रिलीज होईल. या चित्रपटात अक्षय कुमार वकिलाच्या भूमिकेत आहे . या सिनेमात त्याच्यासोबत अभिनेते सतिश कौशिक आणि अन्नु कपूरसुध्दा दिसणारेत.

3.'दंगल' च्या ब्लॉकबस्टर कमाईनंतर मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान त्याचा दुसरा सिनेमा 'सीक्रेट सुपरस्टार' 4 ऑगस्टला रिलीज करतोय . यात आमिर महत्त्वाच्या पण पाहुण्या भूमिकेत दिसणारे.

Loading...

4.या वर्षातला अक्षय कुमारचा दुसरा सिनेमा असेल 'टॉयलेट: एक प्रेम कथा'. हा सिनेमा 2 जूनला थिएटर्समध्ये य़ेईल. यात त्याच्यासोबत अनुपम खेर आणि भूमी पेडणेकर हे कलाकार दिसतील.

5.संजय लीला भंसाळीच्या 'पद्मावती'मध्ये आपल्याला दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग पुन्हा एकदा एकत्र पाहायला मिळतील . हा सिनेमा यावर्षाच्या अखेरीस येईल.या चित्रपटात शाहीद कपुर आणि आदिती राव हैदरीसुध्दा दिसतील.

6.दबंग खान सलमानचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'ट्युबलाईट' हासुध्दा यावर्षी येतोय . यात त्याच्यासोबत चिनी अभिनेत्री झु झु दिसणार आहे . हा सिनेमा भारत-चीन युध्दावर आधारीत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 2, 2017 12:01 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...