फिल्म रिव्ह्यु : 'कि अँड का'

फिल्म रिव्ह्यु : 'कि अँड का'

  • Share this:

अमोल परचुरे, समीक्षक

'कि अँड का' हा आर.बाल्कीचा चौथा सिनेमा.. वेगळा विचार किंवा अचाट कल्पनेवर सिनेमा बनवणं ही आर.बाल्कीची खासियत झालीये. 'चीनी कम', पा किंवा 'शमिताभ', तीनही सिनेमांमधली मध्यवर्ती कल्पना उत्तम होती. त्यातल्या त्यात 'चीनी कम' हा पहिलाच सिनेमा जमून आला होता, पण त्यानंतरचे दोन्ही सिनेमे कल्पनेच्या जास्त आहारी गेल्यामुळे फसले होते. दुदैर्वाने हाच प्रकार कि अँड का बाबतीत घडलेला आहे. ज्याचं स्वागत केलं पाहिजे अशा पुरोगामी विचारावर आधारित पूर्ण सिनेमा बनवत असताना आर.बाल्की भल्त्याच ट्रॅकवर गेला आणि त्यामुळे त्या पुरोगामी आधुनिक विचारांचा पूर्ण विचका झालेला आहे.

काय आहे स्टोरी ?

ki and kaपुरुष नोकरी-धंदा करुन पैसे कमावणार आणि त्या पैशातून स्त्री घर आणि मुलं सांभाळणार... प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते अशा गोष्टी सांगून हा समज आणखी पक्का केला जातो. घर सांभाळणार्‍या महिला या हाऊसवाईफ असतात, म्हणजे त्या काहीच करत नाहीत, फक्त घरी बसून तर असतात असंही अगदी सहज म्हटलं जातं. पण हाऊसवाईफचं काम हे ऑफिसमधल्या कामाइतकंच महत्त्वाचं असतं. एका तरुणानं हेच काम करण्याचं स्वप्न बाळगलं असेल तर काय होईल ते सिनेमात दिसतं.

पण, पुढे त्या दोघांमध्ये का बिनसतं?, एवढ्या समजूतदार जोडप्यात इगो इश्यूज का निर्माण होतात याची कारणं खूपच तोकडी आणि फिल्मी वाटतात आणि मग हा सिनेमा इतर कोणत्याही करण जोहर मंडळींच्या सिनेमांसारखा बनून जातो. त्यातल्या त्यात सिनेमात पाच मिनिटांचा अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांचा जो प्रसंग आहे, तेवढाच अफलातून झालेला आहे. आता तेवढ्या एका सीनसाठी बाकी सिनेमा सहन करायचा की नाही ते तुम्हीच ठरवा..

परफॉर्मन्स

ki and ka1अर्जुन कपूरची निवड हा आर.बाल्कीचा सर्वात चुकलेला निर्णय आहे. सगळ्या सीन्समध्ये ता एकसारखा भासतो, एकसारखं बोलतो. ना आवाजात काही चढउतार, ना हावभावांमध्ये काही बदल..त्याची व्यक्तिरेखा ही सर्वाधिक महत्त्वाची, पण त्यानेच वाईट अभिनय केल्यामुळे सिनेमातली जानच निघून गेलीये. 'शमिताभ'चा अपवाद वगळला तर बाल्कीच्या सिनेमात नेहमी असणारी आईची सशक्त व्यक्तिरेखा याही सिेनमात आहे, आणि त्या भूमिकेसाठी निवड झालीये स्वरुप संपतची... 'साथिया'नंतर इतक्या वर्षांनी ती या सिनेमात दिसली. रजत कपूर नेहमीप्रमाणे आपल्या भूमिकेत होते. तर करीनाने आपल्या भूमिकेला नेहमीप्रमाणे न्याय दिलाय.

रेटिंग 100 पैकी 40

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: April 2, 2016, 6:59 PM IST

ताज्या बातम्या