व्हॅट वाढला, महागाई भडकणार

17 मार्चराज्याचे यंदाचे बजेट मांडण्यापूर्वीच राज्यसरकारने 1 टक्का व्हॅट वाढवून महागाईत भर टाकली आहे. शेड्यूल सी मधील वेगवेगळ्या 97 विभागातील वस्तूंवरचा व्हॅट 4 टक्क्यांवरून 5 टक्के करण्यात आला आहे. आठ दिवसांपूर्वीच व्हॅटमधे वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. www.mahavat.gov.in या विक्रीकर विभागाच्या वेबसाईटवर या निर्णयाचे नोटिफेकेशन जारी करण्यात आले आहे. यामुळे औषधे, अन्नधान्य, दुधाचे पदार्थ, बेकरी पदार्थ, मिठाई, पशुखाद्य, बियाणे आणि कपडे तसेच घरबांधणीचे साहित्यही महागणार आहे. व्हॅटमधे ही वाढ केल्याने राज्य सरकारला 700 कोटींचा अतिरिक्त महसूल मिळणार आहे. एक एप्रिलपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. व्हॅटमधे वाढ केल्याने कोणत्या वस्तू महाग होतील ते पाहूयात- तांदूळ, गहू, आटा, रवा, मैदा, हळद, मिरचीवरील 0 टक्के व्हॅट 4 टक्के करण्यात आला आहे.साबुदाणा आणि खाद्यतेलावर आता 4 ऐवजी 5 टक्के व्हॅट असेलपशुखाद्य, बियाणे, शेती औजारे, खते, ट्रॅक्टर, पंपसेट महागतीलदुधाचे पदार्थ, मिठाई, बेकरी प्रॉडक्टस, फरसाण महाग होईलबांधकाम साहित्य, कॉम्प्युटरसारख्या इलेक्ट्रॉनिक वस्तू, औद्योगिक केबल्स, न्यूजप्रिंट, स्टेशनरी महाग होईल

आईबीएन लोकमत | News18 Lokmat | Updated On: Mar 17, 2010 09:53 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 17, 2010 09:53 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...