वेगळ्या धाटणीचा 'फुंतरु'

वेगळ्या धाटणीचा 'फुंतरु'

  • Share this:

 अमोल परचुरे, समीक्षक

मराठीत सध्या अनेक प्रयोग होतायत, म्हणजे हल्ली असं म्हणायची पद्धत आहे. मराठीच्या कक्षा रुंदावण्यासाठी वेगळ्या विषयांवर सिनेमे बनत असतात, म्हणून असं म्हटलं जातं. पण या सगळ्या गर्दीत खरी प्रयोगशीलता जपणारे फार थोडेजण आहेत. त्यात अजूनतरी एक नाव घेतलं जातं, सुजय डहाकेचं... 'शाळा' सिनेमाच्या वेळेस तो उमदा दिग्दर्शक होता.

phuntroo`त्यानंतर आलेल्या आजोबा सिनेमाच्या वेळेस स्वत:ची आणि प्रेक्षकांची अपेक्षा पूर्ण न करू शकलेला दिग्दर्शक होता आणि आता फुंतरुच्या वेळेस या तरुण दिग्दर्शकाने पुन्हा अपेक्षा निर्माण केलेल्या आहेत. यावेळेस त्याने मराठीतला पहिला साय-फाय सिनेमा सादर केलाय. साय-फाय म्हणजे सायन्स फिक्शन फिल्म...आता तसं म्हटलं तर जानेवारीत रिलीज झालेला बंध नायलॉनचे हासुद्धा साय-फायच्या जवळ जाणारा सिनेमा होता, पण त्यापेक्षा बर्‍याच मेहनतीने आणि विचारपूर्वक फुंतरुची निर्मिती झालेली आहे. वेगळ्या धाटणीचे सिनेमे बघण्याची आवड असेल, प्रचंड धमाल म्हणजेच व्यावसायिक सिनेमा हे समीकरण डोक्यात फिट्ट नसेल तरच तुम्ही फुंतरुच्या वाटेला जा, नाहीतर फुंतरु तुमचा शत्रू बनेल...

काय आहे स्टोरी ?

phuntroo2तसं म्हटलं तर 'फुंतरु'ही आभासी म्हणजेच व्हर्च्युअल जगातली प्रेमकहाणी आहे. पण यातून दिग्दर्शकाला सध्याच्या सोशल मीडियाच्या आभासी जगावरही भाष्य करायचं असावं, अर्थात त्याने ते सायलेंटली केलेलं आहे. एकमेकांच्या विधानांवर व्यक्त होणं, लाईक करणं, खेळीमेळीने राहत असताना बिनधास्तपणे विधानं करणं, वाद घालणं, भांडणं, सगळं सोशल मीडियासारखं...अर्थात, प्रत्यक्ष कथेशी सोशल मीडियाचा संबंध नसला तरी फार चतुराईने ही सगळी रचना केलेली जाणवते.

आभासी जग आणि वास्तव जगाची गल्लत झाली की काय होतं ते यापूर्वी अनेक हॉलीवूडपटात आपण पाहिलेलं आहे, पण दिग्दर्शकाला इथे यंत्र विरुद्ध मानव असा संघर्ष अपेक्षित नाही. उलट यंत्राचा झालेला कोंडमारा सिनेमात दिसतो. दुदैर्व एवढंच की हे वेगळेपण शेवटपर्यंत टिकत नाही. उत्तम टेकिंग, आऊट ऑफ द बॉक्स आयडिया या सगळ्यावर सिनेमाच्या शेवटी अक्षरश: पाणी पडतं.

परफॉर्मन्स

अशा साय-फाय सिनेमांमध्ये फँटसी किंवा जो काही वैज्ञानिक प्रयोग आहे तो प्रेक्षकांना पटवून देणं, हे मोठं आव्हान असतं. हे आव्हान सुजय आणि टीमने चांगलं पेललंय. नायकाची मेहनत किंवा त्याचं झपाटलेपण, एकूणच विज्ञानसुसंगत वातावरण, यावर खूप काम करण्यात आंलय. यात अभिनयाचा भागही महत्त्वाचा आहे. केतकी माटेगावकर आणि मदन देवधर यांची आणि या दोघांच्या लूक्सवर घेतलेली मेहनत विशेष जाणवते.

phuntroo3हे दोघेच नाही तर सिनेमातला प्रत्येक कलाकार सहजपणे वावरतो, त्यांच्या तोंडी असलेली भाषा आजची आहे, ओढूनताणून असं काहीच नाही. तांत्रिकदृष्टया तर कुठेही कसलीही कसर राहणार नाही याची काळजी घेतलेली आहे, जी अशा सायफाय सिनेमात अत्यंत महत्त्वाची असते. फक्त कथेचा प्रवाह भरकटणार नाही याकडेही लक्ष द्यायला हवं होतं. असो, 'आजोबा'च्या अपघातातून सुजय आता सावरलाय हेही नसे थोडके...

रेटिंग 100 पैकी 50

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 12, 2016 06:48 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading