S M L

सलमान म्हणतो, 'मी आहे शाहरूखचा 'फॅन''

Samruddha Bhambure | Updated On: Mar 1, 2016 08:47 PM IST

सलमान म्हणतो, 'मी आहे शाहरूखचा 'फॅन''

416062-salman-and-shahrukh-recreating-karan-arjun-moment3

01 मार्च :  बॉलीवुडचा दबंग खान सलमानने नुकतंच आपल्या ट्विटर अकाऊंटवर 'मी शाहरूखचा 'फॅन' आहे', असं जाहिर केलं आहे. आज शाहरुखच्या 'फॅन' चित्रपटाचा दुसरा ट्रेलर रिलीज झाला असून सलमानने आपण शाहरुखचे 'फॅन' असल्याचं ट्विट केलं आहे.

Loading...

मित्र-शत्रू-मित्र असे अनोखे नाते असणारे बॉलीवूडमधील दोन सुपरस्टार म्हणजे सलमान खान आणि शाहरुख खान. या दोघांनी एकमेकांच्या सिनेमाचं प्रमोशन करण्याची ही काही पहिलीचं वेळ नाही. यापूर्वीही सलमानने, 'दिलवाले' चित्रपटाबाबतही ट्विट केलं होतं. त्यानंतर शाहरुखनेही सलमानच्या 'प्रेम रतन धन पायो' चित्रपटाचा डबस्मॅश तयार करून पोस्ट केला होता.

मनिष शर्मा दिग्दर्शित आणि यशराजची निर्मिती असलेल्या 'फॅन' चित्रपटात शाहरुख दुहेरी भूमिकेत दिसणार असून हा सिनेमा येत्या 15 एप्रिलला रिलीज होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 1, 2016 07:58 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close