News18 Lokmat

फिल्म रिव्ह्यु : मनोरंजन आणि विचारही करायला लावणारा 'पोश्टर गर्ल'!

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Feb 13, 2016 07:51 PM IST

अमोल परचुरे, समीक्षक

समीर पाटील या दिग्दर्शकाने पोश्टर बॉईज नंतर आता आणलाय पोश्टर गर्ल...नामसाधर्म्य असलं तरी दोन्ही सिनेमांचा एकमेकांशी काहीही संबंध नाही. समान गोष्ट आहे ती म्हणजे हसवता हसवता संदेश देण्याची...पोश्टर बॉईजमध्ये पुरुषी मानसिकतेवर फटके मारले होते, आणि आता स्त्री भ्रुण हत्या, शेतीबद्दल कमी होत असलेली आस्था, अशा विषयांना हात घातलेला आहे. उगाच धांगडधिंगा करुन, अंगविक्षेप करुन अडीच तास फुकट घालवणार्‍या सिनेमांपेक्षा पूर्णपणे वेगळा म्हणजे मनोरंजनही करणारा आणि विचारही करायला लावणारा असं पॅकेज या सिनेमाने दिलेलं आहे. सिनेमाच्या सुरू होताच लगेचच 'आवाज वाढव डीजे' हे गाणं सुरू होतं, आणि तिथेच वातावरणनिर्मिती होऊन जाते. तसा एका सरळ रेषेत जाणारा सिनेमा असला तरी लेखनातले पंचेस आणि कलाकारांच्या टायमिंगमुळे सिनेमाची लज्जत वाढत जाते.

काय आहे स्टोरी ?

Poshter_Girl_sonali_kulkarni_ (1)ही टेकवडे गावातली गोष्ट आहे. स्त्री भ्रुण हत्येच्या गुन्ह्याचा अतिरेक म्हणजे टेकवडे गाव...गेल्या अनेक वर्षांपासून यागावात मुलीचा जन्मच होऊ दिलेला नाही, मुलगी झालीच तर बायको माहेरी असा सगळा प्रकार...म्हणजे गावात बायका आहेत पण जवान मुली नाहीयेत, त्यामुळे गावातल्या तरुण पुरुषांचा प्रॉब्लेमच झालाय. साध्या दृष्टीसौंदर्याचा अनुभवही त्यांना मिळत नाही. प्रॉब्लेम होत असला तरी त्यांना अक्कलही येत नाही. आपल्याच धुंदीत आणि मग्रुरीत ते चकाट्या पिटत असतात. या गावातल्या श्रीमंत तरुणांच्या हातात टॅब आलेत, पण त्यांच्या डोक्यातले टॅबू काही जात नाहीयेत. अशा या टेकवडे गावातल्या एका गँगला एक आधुनिक रखुमाई कशी वठणीवर आणते त्याची ही गोष्ट...

परफॉर्मन्स

Loading...

Poshter_Girl_sonali_kulkarni_ (12)सगळ्याच कलाकारांची कल्लाकारी आणि लेखकाची अदाकारी ही या पोश्टर गर्लची खास बात...आनंद इंगळे आणि वैभव मांगले यांनी नेहमीचंच काम केलं असलं तरी बाकी प्रत्येकाने धमाल उडवलीये. मुळात या कॅरेक्टर्सची आयडीयाच भन्नाट आहे आणि एकापेक्षा एक अवली कलाकारांनी ती कॅरेक्टर्स रंगवताना स्वत:ही एंजॉय केलंय आणि त्यामुळे त्यांचा परफॉर्मन्स आपणही एंजॉय करतो. सत्तेचा माज असलेल्या उपसरपंचाचं अर्कचित्र जितेंद्र जोशीने मस्त उभं केलंय. दणकट शरीरयष्टीचा पण मुलींसमोर बुजणारा पहिलवान अनिकेत विश्वासरावने फारच छान केलाय.

Poshter_Girl_sonali_kulkarni_ (11)बियर शॉपी मालकाचा तर्राट मुलगा साकारताना सिद्धार्थ मेननने बरीच धमाल केलीये. सुरेश-रमेश, गावातले मॅड जुळे सतत हातात टॅब घेऊन सनी लावणीचे व्हिडिओ बघणारे, नेहमीच भडक कपड्यांमध्ये फिरणारे, संदीप पाठक आणि अक्षय टाकसाळेने या जुळ्यांच्या भूमिकेत कल्ला केलाय. खासकरुन संदीप पाठकचं टायमिंग तर अफलातूनच आहे. असंच सुसाट टायमिंग आहे हृषिकेश जोशीचं... नायिकेच्या काकाच्या रोलमध्ये ह्रषिकेशने पंचसवर पंचेस काढलेत. सोनालीची भूमिका अतिशय महत्त्वाची...

रेटिंग 100 पैकी 60

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 13, 2016 07:45 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...