News18 Lokmat

रिव्ह्यु : 'फुल्ली फिल्मी फँटम'

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Aug 29, 2015 03:07 PM IST

अमोल परचुरे, समीक्षक

दहशतवाद, भारत-पाक संबंधांवरचे सिनेमे आणि कबीर खान हे आता समीकरण बनत चाललंय. 'न्यूयॉर्क', 'एक था टायगर', 'बजरंगी भाईजान' आणि आता 'फँटम'... सामान्यत: दर सिनेमागणिक त्याच्या दिग्दर्शनात सुधारणा अपेक्षित होती, ती अपेक्षा मात्र अजून पूर्ण होत नाहीये...जागतिक दहशतवादाचा विषय घेऊन त्याला बॉलीवूड मसाला सिनेमाच्या कव्हरमध्ये गुंडाळण्याची काय एवढी हौस असते तेच कळत नाही. खरंतर बॉलीवूडमध्येही गेल्या काही काळात बरेच उत्तम दर्जाचे सिनेमे बनलेले आहेत. 'मद्रास कॅफे', 'बेबी' अशा सिनेमांनी हे दाखवून दिलंय की, प्रेक्षकांना आवडतं या नावाखाली नेहमीचे फंडे वापरण्याची गरज नसते. पण अजूनही त्याची सवय कबीर खानसारख्या दिग्दर्शकांना होत नाहीेय हीच खरी आपली, म्हणजे प्रेक्षकांची शोकांतिका आहे.

काय आहे स्टोरी ?

ph8-jul25स्टीव्हन स्पीलबर्गने 'म्युनिक' हा सिनेमा बनवला त्याला आता दहा वर्षं लोटली...पॅलेस्टाईन अतिरेक्यांना नेस्तनाबूत करण्यासाठी इस्त्रायलची मोसाद ही गुप्तचर संस्था कशा प्रकारे ऑपरेशन पार पाडते त्याची गोष्ट होती म्युनिकमध्ये... नेमकी हीच कल्पना कबीर खानने उचलली आहे. त्यासाठी आधार घेतला हुसेन झैदी यांच्या मुंबई ऍव्हेंजर्स या पुस्तकाचा... 26/11 रोजी मुंबईवर जो अतिरेकी हल्ला झाला त्याला जे कोणी जबाबदार होते त्यांचा खात्मा करण्यासाठी रॉ कडून एका फँटमची नेमणूक होते आणि मग तो कशा बालिश पद्धतीने त्याचं मिशन पार पाडतो ते या अख्ख्या सिनेमात दाखवलेलं आहे. सिरीया, शिकागो, लंडन, पाकिस्तान अशी ही या फँटमची सफर आहे, जी प्रेक्षकांना सफर करावी लागते...अशा सिेनमांमधून आपण आपल्या गुप्तचर यंत्रणांचं जगभरात हसं करुन घेतोय एवढा साधा विचार तरी कबीर खानने करायला हवा होता.

परफॉर्मन्स

Loading...

ph10-jul25चांगल्या कल्पनेचा विचका तर केलाच, वर कबीर खानने मुख्य भूमिकांसाठी सैफ अली खान आणि कटरिना कैफला घेतलंय. अशा सिनेमांमध्ये फक्त ऍक्शन नसते तर अभिनयही करावा लागतो याची बहुदा दोघांनाही कल्पना नसावी, दिलासा एवढाच आहे की बाकी सर्व कलाकारांनी सुंदर कामं केलेली आहेत. सब्यसाची चक्रवर्ती, मोहम्मद झीशान अशा कलाकारांनी केलेला अभिनय एवढीच काय ती सिनेमातली सांगण्यासारखी गोष्ट आहे.

रेटिंग 100 पैकी 40

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 29, 2015 03:07 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...