फिल्म रिव्ह्यु : आंबट'शौकीन्स'

फिल्म रिव्ह्यु : आंबट'शौकीन्स'

  • Share this:

अमोल परचुरे, समीक्षक

बॉलीवूडमध्ये सर्वांना गेल्या काही वर्षांपासून रिमेकचा छंदच जडलाय. डॉन,जंजीर, अग्निपथ नंतर आता शौकीनचासुद्धा रिमेक आलाय. अर्थात, त्याला ऑफिशिअल रिमेक म्हणत नसले तरी थीम जवळपास तशीच आहे. बासू चटर्जी यांनी 1982 साली शौकीन सिनेमा बनवला होता. आता 32 वर्षांनंतर तशाच नावाचा सिनेमा दिग्दर्शित केलाय अभिषेक शर्माने.. अभिषेक शर्माने याआधी 'तेरे बिन लादेन'सारखे सिनेमे केलेले आहेत. बरं, हा सिनेमा लिहीलाय तिग्मांशू धुलियाने...त्यामुळे काहीतरी खमंग, चमचमीत मेजवानीची अपेक्षा तुम्हीसुद्धा केली असेल, प्रत्यक्षात हा सिनेमा म्हणजे थोडी थिल्लर आणि थोडी बोरिंग सेक्स कॉमेडी आहे. मुख्य कथेपेक्षा पाहुणा कलाकार अक्षय कुमारची गंमतच जास्त चांगली आहे. हा सिनेमा बघून ओरिजिनल ते ओरिजिनल यावर तुमचा नक्की विश्वास बसेल. अशोक कुमार, ए.के.हंगल आणि उत्पल दत्त यांनी जी काही धमाल केली होती त्याची सर अनुपम खेर, अन्नू कपूर आणि पियुष मिश्रा यांना येऊ शकलेली नाही, आणि याला कारणीभूत आहे ती कमजोर आणि रेंगाळणारी पटकथा..इंटरव्हलनंतर अक्षय कुमार आणि सायरस ब्रोचा यांनी मात्र बर्‍यापैकी हसवलेलं आहे.

काय आहे स्टोरी ?

shaukeen movie 2014ही गोष्ट आहे दिल्लीत राहणार्‍या तीन आंबटशौकीन मित्रांची... ज्यांच्याकडे बघून कुणीही साठी बुध्दी नाठी म्हणेल असे याचे प्रताप आहेत. सतत शरीरसुखाचा हव्यास असला तरी प्रत्येकवेळेस नेत्रसुखावरच त्यांना समाधान मानावं लागतं. शेवटी ते कार्यभाग साधण्यासाठी परदेशात जायचं ठरवतात आणि निवड करतात मॉरिशसची... मॉरिशसमध्ये राहण्यासाठी ते एक अपार्टमेंट बुक करतात, ज्याची मालकीण असते यंग आणि बिन्दास अहाना...या अहानाला आकर्षित करण्यासाठी मग या तिघांमध्ये स्पर्धा सुरू होते आणि त्याचदरम्यान अक्षय कुमारच्या सिनेमाचं शूटिंगही मॉरिशसमध्ये सुरू असतं, मग त्यानंतर अक्षय कुमार, हे तीन म्हातारे आणि अहाना आमनेसामने येतात आणि मग थोडीफार धमाल करुन सिनेमा संपवतात. नॅशनल ऍवॉर्ड मिळवण्यासाठी अक्षय कुमारचा जो आटापिटा सुरू असतो तोच या सिनेमातला हायपॉईंट आहे.

परफॉर्मन्स

अनुपम खेर, अन्नू कपूर आणि पियुष मिश्रा हे कलाकार म्हणून खूप ग्रेट आहेत, पण शौकीन्समध्ये त्यांचा हा ग्रेटनेस वाया घालवल्यासारखा वाटतो. ठरकीपणा करण्याचे त्यांचे जे उद्योग आहेत त्यता तोचतोचपणा आहे, त्यामुळे ते कितीही मनापासून काम करत असले तरी त्याचा कंटाळा यायला लागतो. क्वीनमध्ये कंगनाच्या मैत्रिणीच्या भूमिकेतली लिझा हेडनला शौकीन्समध्ये काय काम असेल याचा तुम्हाला पोस्टरवरुनच अंदाज आला असेल. खरी धमाल अक्षयकुमार आणि सायरसने आणलीये. अक्षयकुमारने स्वत:वर करु दिलेले विनोद पाहण्यासारखे आहेत.

रेटिंग 100 पैकी 50

Follow @ibnlokmattv

First published: November 9, 2014, 7:06 PM IST

ताज्या बातम्या