'इंडियन सुपर लीग'चा शानदार सोहळा

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Aug 28, 2014 11:47 PM IST

'इंडियन सुपर लीग'चा शानदार सोहळा

[wzslider]

मुंबईत एका पंचतारांकीत हॉटेलमध्ये इंडियन सुपर लीगचा मोठ्या दिमाखात शुभारंभ करण्यात आला. इंडियन सुपर लीगमधून आपल्याला भारताचे उद्याचे फुटबॉल स्टार्स मिळणार आहेत पण या नवा ‘मोहिमे’ची सुरुवात केली ती रिलायन्स फायउंडेशनच्या चेअरमन नीता अंबानी यांनी. देशात फुटबॉल सारख्या खेळाला एक वेगळा दर्जा मिळेल याचा येणार्‍या पिढीला मोठा फायदा होईल असा विश्वास नीता अंबानी यांनी व्यक्त केला.

या लीगच्या निमित्ताने क्रिकेटपटू आणि अभिनेते एकाच व्यासपीठावर एकत्र आले आहेत. आजच्या या सोहळ्याला मास्टर ब्लास्टर आणि विक्रामादित्य सचिन तेंडुलकर, अभिनेता रणबीर कपूर, जॉन अब्राहम,अभिषेक बच्चन हजर होते. यावेळी देशात फुटबॉलला अधिक उंची लाभेल अशा विश्वास सर्वांनी व्यक्त केला.

Loading...

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 28, 2014 10:09 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...