दोन गोष्टींचा 'वन बाय टू'

दोन गोष्टींचा 'वन बाय टू'

  • Share this:

अमोल परचुरे, समीक्षक

वन बाय टू...थोडे वेगळ्या वाटेवरचे सिनेमे ज्यांना आवडतात त्यांना अभय देओलचे सिनेमे नक्कीच आवडत असतील. अहिस्ता अहिस्ता, मनोरमा सिक्स फीट अंडर पासून ते अगदी 'देव डी' आणि 'शांघाय'पर्यंत असेल, त्याची सिनेमांची निवड एकदम अफलातून असते. त्याच्या सिनेमांना अजूनपर्यंत तरी बॉक्स ऑफिसवर मर्यादित असंच यश मिळालंय. पण त्याने बरेच प्रयोग केलेत एवढं नक्की...आता तर नव्या टॅलेंटला प्रोत्साहन देण्यासाठी तो निर्मातासुद्धा बनलाय. 'वन बाय टू'हा निर्माता म्हणून त्याचा पहिलाच सिनेमा. 'वन बाय टू' वैशिष्टयपूर्ण नक्कीच आहे, पण फार ग्रेट नाहीये. सिनेमात वेगळेपण नक्कीच आहे, पण त्याचा पसारा आटोपशीर ठेवण्यात लेखिका आणि दिग्दशिर्का देविका भगत यांना अपयश आलंय. पण त्रुटी असल्या तरी एकदातरी हा अनुभव घ्यायला हवा असं नक्कीच सांगता येईल. शहरी-निमशहरी दोन्ही प्रेक्षकांना हा सिनेमा फार अपील करणार नाही, कारण 'वन बाय टू'मध्ये उच्चभ्रू जगाचं चित्रण आहे. पण मानवी भाव-भावनांच्या दृष्टीने पाहिलं तर हा सिनेमॅटिक खेळ चांगला एंजॉय करता येईल.

काय आहे स्टोरी ?

o34562

चहा असो किंवा सूप... आपण बर्‍याचदा ऑर्डर करताना वन बाय टू सांगतो, कारण तसं केलं की, क्वान्टिटी जास्त मिळते. हाच नियम नात्यांमध्ये लावायचा प्रयत्न लेखिकेने केलाय. टिपिकल सिनेमांप्रमाणे ही नायक-नायिकेची गोष्ट नाहीये. नायकाचं आणि नायिकेचं दोघांचंही जग वेगळं, सुख-दु:खं वेगळी आणि पडद्यावर आपल्याला दिसत राहतात त्यांच्या वेगवेगळ्या गोष्टी..ते एकमेकांना कधी भेट नाहीत, पण त्यांचात एक धागा आहे. जो फक्त आपल्यालाच माहिती आहे. नायक-नायिका एकमेकांशी कधी बोलत नाहीत, भेटत नाहीत, त्यांचा एकमेकांशी काही संबंधच नाही. आता याचा नेमका अर्थ काय ते तुम्हाला सिनेमा बघूनच कळेल.

2352 abhay

समायरा ही भारतीय वंशाची ब्रिटीश नागरिक...सध्या ती मुंबईत आपल्या आईकडे राहतेय. तिचं पॅशन आहे डान्स, आणि डान्समध्येच तिला काहीतरी भरीव करायची इच्छा आहे. अमित शर्मा हा एका सॉफ्टवेअर कंपनीत काम करतोय. सध्या तो ब्रेकअपमुळे उद्‌ध्वस्त झालाय. घरी आईने लग्नासाठी भुणभुण लावलीये आणि त्याला त्याची गर्लफ्रेंड परत मिळवायची आहे, पण त्याच्या गर्लफ्रेंडला तर तो अगदीच बोअर वाटतोय. आता अमित आणि समायरा एकमेकांना भेटून त्यांच्या लव्हस्टेारीला सुरुवात होणार असा ट्रॅक न आणता दोन्ही भिन्न स्टेारीज लेखिकेला सांगायच्या आहेत. त्याअर्थानेही वन बाय टू म्हणजे एका सिनेमात दोन स्टेारीज असा टायटलचा अर्थ घेता येईल..

नवीन काय ?

452357abhy345

वेगळ्या धाटणीची गोष्ट ज्या अलग प्रकारे सादर केलीये, त्यालासुद्धा दाद द्यायला हवी. लेखनात सिनेमा थोडा कमजोर पडला असला आणि इंटरव्हलनंतर थोडा ताणला असला तरी त्याचं सादरीकरण बघण्यासारखं आहे. एडिटिंग आणि कॅमेराची जी कमाल आहे ती मोठ्या पडद्यावर अनुभवावी अशीच आहे. दुदैर्वाने त्याला सातत्य दिसत नाही. अभिनयात अभय देओलने लाजवाब अभिनय केलाय. प्रीती देसाई या अभिनेत्रीनेसुद्धा आपल्या दुसर्‍याच सिनेमात चांगलीच छाप पाडलीये. तिला हिंदी बोलण्यावर खूप काम करावं लागेल, पण ती अभिनयात कतरिना कैफपेक्षा बरीच उजवी आहे हे खरं.. बाकी रती अग्निहोत्री, जयंत कृपलानी, दर्शन जरीवाला, लिलिएट दुबे यांनीसुद्धा मस्त अभिनय केलाय.

First published: February 1, 2014, 7:25 PM IST

ताज्या बातम्या