फिल्म रिव्ह्यु : 'डेढ इश्किया'

फिल्म रिव्ह्यु : 'डेढ इश्किया'

  • Share this:

अमोल परचुरे, समीक्षक

सिनेमा मग तो कोणताही असो, पण तो बघणं किंवा त्याचा आस्वाद घेणं हा खरंच एक सोहळा असतो. हल्ली खरंतर बरेच सिनेमे असे असतात की, ते बघितल्यावर थिएटरबाहेर पडताना आपला चेहरा कडू झालेला असतो. पण 'डेढ इश्किया' हा असा सिनेमा अजिबात नाहीये, हा सिनेमा बघून जेव्हा तुम्ही थिएटरबाहेर पडाल तेव्हा तुमच्या चेहर्‍यावर एक हलकं स्माईल असेल, एक सुंदर सिनेमा बघितल्याचा आनंद असेल आणि महत्त्वाचं म्हणजे आपले पैसे वसूल झाल्याचं समाधानही असेल. एक अतिशय देखणा, दर्जेदार, सशक्त सिनेमा बनवण्यात विशाल भारद्वाज आणि दिग्दर्शक अभिषेक चौबे हे पूर्णपणे यशस्वी ठरलेले आहेत.5556 dedh ishqiya 4565

खरंतर, सिक्वेल हे मूळ सिनेमापेक्षा सरस आहेत असं उदाहरण सहसा बघायला मिळत नाही. पण 'डेढ इश्किया' हा इश्कियापेक्षा सगळ्याच बाबतीत एक पाऊल पुढे आहे. कथा, पटकथा, दिग्दर्शन, वेशभूषा, लोकेशन्स, कॅमेरा, एडिटिंग आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळ्याच कलाकारांची सणसणीत अदाकारी, सगळं एकदम मस्त जमून आलेलं आहे. 'डेढ इश्किया'मध्ये ऊर्दू भाषेची, ऊर्दू वातावरणाची नजाकत आहे. संवादांमध्ये कसक आहे, शेरोशायरीने नटलेल्या संवादांचा एक रुतबा आहे. अदब आहे, नवाबी ऐट आहे, बेगम पाराच्या हवेलीसारखाच सिनेमाही आलिशान आहे. डेढ इश्कियाची तारीफ करायला अशी अनेक विशेषणं वापरता येतील, पण ही तारीफ ऐकण्यापेक्षा प्रत्यक्ष थिएटरमध्ये जाऊन सिनेमा बघा, तुमची निराशा होणार नाही याची गॅरंटी...

काय आहे स्टोरी?---dedh ishqiya 4565

हा खर्‍या अर्थाने सिक्वेल आहे, इश्कियासारखंच यातही खालू आणि बब्बन, म्हणजेच नसिरुद्दीन आणि अर्शद वारसी डॉन मुश्ताकच्या तावडीतून स्वत:ला सोडवतात, आणि मग अजून एक दरोडा टाकण्यासाठी नवाबी थाटात मेहबूबाबादमध्ये दाखल होतात. मेहबूबाबादची बेगम पारा ही दरवर्षी एक मुशायरा भरवत असते, जे खरंतर एक स्वयंवर असतं. जगभरातून शायर इथे आपली शायरी पेश करायला आणि बेगम पाराचं मन जिंकायला येत असतात. यावर्षी आपण बाजी मारायची असं खालू ठरवतो, पण त्याला स्पर्धा असते जान महंमद म्हणजेच विजयराजची...यानंतर जे काही घडतं, जे उलगडत जातं ते सिनेमातच बघायला हवं. कथेमध्ये खूप पात्रं नाहीत, त्यामुळे खूप गोंधळ नाही, कथा बंदिस्त वाटत असली तरी त्यात एकात एक अनेक गोष्टी आहेत, संदर्भ आहेत, हे सगळे एकत्र करुन कथा गुंफणं हे लेखक-दिग्दर्शक अभिषेक चौबे याने मोठ्या कौशल्याने जमवलेलं आहे.

नवीन काय ?

Madhuri-Dixit

'डेढ इश्किया'मधली गाणी लोकप्रिय झाली नाहीत, पण सिनेमा बघताना ही गाणी खटकतही नाहीत. विशाल भारद्वाज संगीतात थोडा कमी पडला असला तरी त्याने लिहीलेले संवाद हे सिनेमाला वेगळ्याच उंचीवर घेऊन जाणारे आहेत. गाण्यांबरोबरच यात महत्त्वाची आहे शेरो-शायरी.. ज्या नजाकतीने एक एक शायर ही शायरी पेश करतो त्यासाठी तर हा सिनेमा पुन्हा पुन्हा पाहणारेही असतील. 'डेढ इश्किया'चं आणखी एक वैशिष्टय म्हणजे वेशभूषा..नवाबी थाट आणि बेगम पाराचं सौंदर्य खुलून दिसावं, अगदी अस्सल वाटावं यासाठी बरीच मेहनत घेतलेली आहे. कुठेही तडजोड नाही, वेशभूषेप्रमाणेच लोकेशन्समुळेही सिनेमाचा दिमाख आणखी वाढलाय. हाच दिमाख सत्यजित पांडे यांच्या कॅमेरानं सुंदर टिपलेला आहे. दिल चाहता है, युवा, साथिया, शैतान, कॉकटेल, कमिने, सात खून माफ असे अनेक दर्जेदार सिनेमे ज्यांनी एडिट केले त्या श्रीकर प्रसाद यांनी डेढ इश्कियाला अक्षरश: चारचाँद लावलेत. एकूणच तांत्रिक बाजूंमध्येसुद्धा सगळंच जमून आलेलं आहे.

परफॉर्मन्स

naseeruddinshahjan10

2007 मध्ये आजा नच ले मधून माधुरीने कमबॅक केलं असं बोललं गेलं होतं, पण 'डेढ इश्किया' हाच माधुरीचा खरा कमबॅक सिनेमा आहे असं म्हणावं लागेल. माधुरी दीक्षित म्हणजे सौंदर्य, नृत्याची जाण आणि सशक्त अभिनय यांचा सुंदर मिलाफ आहे. आपली अभिनयक्षमता सिद्ध करण्याची संधी माधुरीला तशी कमीच मिळाली. पण 'डेढ इश्किया'मध्ये माधुरीला बेगम पाराच्या रुपात पेश करताना दिग्दर्शकाने तिच्या सौंदर्याबरोबरच तिच्या अभिनयालाही तेवढाच वाव दिलाय. तिच्या जोडीला हुमा कुरेशी हे एकदम करेक्ट कास्टींग. हुमाने सुंदर दिसण्याबरोबरच कावेबाजपणा चांगला दाखवलाय.

-Huma-Qureshi

अर्शद वारसीने सिक्वेलमध्येसुद्धा मस्त धमाल केलीये, त्याची आणि नसिरुद्दीन शाह यांची जोडी बाप-मुलासारखी आणखी घट्ट झालीये. नसिरुद्दीन शाह यांच्या अनेक 'ऑल टाईम ग्रेट' भूमिकांमध्ये या खालुजानचा समावेश करावा लागेल. खोट्या नवाबाचं नाटक वठवणं, दीडशहाणे असूनही प्रेमदीवाणे बनणं, प्रेमात बुडून जाणं हे सगळं पेश करताना नसिरुद्दीन यांनी अभिनयाचे सगळे प्रकारच सादर केलेत. म्हणजे काही सीन्सना तर उभं राहून सलाम करावा असंच वाटून जातं.

या सर्व दिग्गजांच्या जोडीने तडफदार आणि कमाल अभिनय केलाय विजयराजने...विजयराजच्या करिअरमधला हा आत्तापर्यंतचा महत्त्वाचा आणि मोठा रोल.नसिरुद्दीन शाह यांच्या बरोबरीने उभं राहताना त्याने साकारलेला जान महंमद हा व्हिलन टेररही आहे आणि हसवणाराही आहे. डेढ इश्कियाच्या प्रत्येक गोष्टीबद्दल असं बरंच भरभरुन बोलता येईल, पण थोडक्यात एवढंच सांगेन विशाल भारद्वाज आणि अभिषेक चौबे यांचा हा मास्टरपीस आवर्जून बघितलाच पाहिजे असा आहे.

रेटिंग - 75

First published: January 10, 2014, 6:40 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading