26 सप्टेंबर : ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांना लीलावती हॉस्पिटलमधून आज डिस्चार्ज देण्यात आलाय. आज दुपारी ते हॉस्पिटलबाहेर आले. त्यावेळी चाहत्यांनी त्यांचं उत्साहात स्वागत केलं. गेल्या आठवड्यात त्यांना ह्रदयविकाराचा झटका आल्यामुळे तातडीने लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. आता त्यांची तब्येत ठीक असून त्यांना डॉक्टरांनी डिस्चार्ज दिलाय. बुधवारीच अभिनेते अमिताभ बच्चन यांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन दिलीप कुमार यांची भेट घेतली होती. दिलीप कुमार यांच्या तब्येत सुधार व्हावा यासाठी त्यांच्या चाहत्यांनी देव पाण्यात ठेवला होता. अखेरीस आज दिलीप कुमार यांना डिस्चार्ज मिळाल्यामुळे चाहत्यांची मोठ्या उत्साहानं हॉस्पिटलबाहेर स्वागत केलं.