अर्शी खाननं 6 महिन्यातच केला काँग्रेसला रामराम, सोशल मीडियावर शेअर केली पोस्ट

अर्शी खाननं 6 महिन्यातच केला काँग्रेसला रामराम, सोशल मीडियावर शेअर केली पोस्ट

सोशल मीडियावर पोस्ट करत तिने याबाबत माहिती दिली. या पोस्टमध्ये तिनं अशाप्रकारे पक्षातून एक्झिट घेण्याचं कारणही सांगितलं आहे.

  • Share this:

मुंबई, 24 ऑगस्ट : निवडणुकांच्या अगोदर बॉलिवूड आणि मनोरंजन जगतातले अनेकजण राजकीय पक्षांमध्ये प्रवेश करतात. काहीना यात यश मिळत तर काहीजण काही काळानंतर यातून बाहेर पडतात. अशीच आहे एक सेलिब्रिटी आहे बिग बॉसची माजी स्पर्धक अर्शी खान. अर्शी खाननं 6 महिन्यांपूर्वी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता मात्र आता नुकताच तिनं या पक्षाचा राजीनामा दिला आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत तिने याबाबत माहिती दिली. तिची ही पोस्ट सध्या सगळीकडे व्हायरल होताना दिसत आहे. या पोस्टमध्ये तिनं अशाप्रकारे पक्षातून एक्झिट घेण्याचं कारणही सांगितलं आहे.

अर्शी खाननं ट्विटरवर एक पोसेट करत ती काँग्रेस पक्षाचा राजीनामा देत असल्याची घोषणा केली आहे. तिनं आपल्या पोस्टमध्ये लिहिलं, ‘इंडस्ट्रीमध्ये माझं काम वाढत असल्यानं मी राजकीय क्षेत्रात माझं योगदान देऊ शकत नाही. त्यामुळेच मी आता इंडियन नॅशनल काँग्रेस पक्षाचा राजीनामा देत आहे. मी त्यांना धन्यवाद देते की, त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला समाजासाठी काहीतरी करण्याची संधी त्यांनी मला दिली. मी एक जबाबदार नागरिक म्हणून माझं हे कर्तव्य निभावत राहीन.’

KBC : PUB-G चा फुलफॉर्म विचारताच स्पर्धकानं वापरली लाइफलाइन

अर्शीनं आपल्या राजीनाम्याचं कारण दुसरं काही नसून इंडस्ट्रीमधील वाढतं काम असल्याचं स्पष्ट केलं. तिनं लिहिलं, माझ्या राजीनाम्याचं कारण दुसरं काही नसून सिनेमा, वेब सीरिज, म्यूझिक आणि व्हिडीओ प्रोडक्शनशी मी कमिटेड आहे. मी एक अभिनेत्री, एंटरटेनर आणि जबाबदार व्यक्ती म्हणून स्वतःला सिद्धा करू इच्छिते. सर्वांना प्रेम आणि मला पाठिंबा दिल्याबद्दल आभार.

'या' अभिनेत्रीनं विकी कौशलचा प्रेमात केला घात, VIDEO VIRAL

अर्शीनं या वर्षाच्या सुरुवातीला काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. त्यावेळी तिला मोठं पदही देण्यात आलं होतं. त्यावेळी आपण जनरल इलेक्शनमध्ये बाग घेणार असल्याचंही तिनं सांगितलं होतं. ती काँग्रेस पक्षाची मुंबई प्रदेश मायनॉरिटी वेलफेयर कमिटीची वाइस प्रेसिडेंट होती. मात्र अर्शीनं अचानक पक्ष सोडल्यानं सर्वांनाच धक्का बसला. अर्शी ही बिग बॉस 11 मधील सर्वात वादग्रस्त स्पर्धक होती. या शोमुळे तिला चांगली लोकप्रियता मिळाली आहे.

VIDEO फॅशन शो दरम्यान पाय अडखळून रँपवरच पडली असती ही प्रेग्नंट अभिनेत्री...

=========================================================================

SPECIAL REPORT: UNICEFचा प्रियांकाला पाठिंबा, पाकिस्तान पुन्हा तोंडावर आपटलं!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 24, 2019 01:58 PM IST

ताज्या बातम्या