• Home
  • »
  • News
  • »
  • entertainment
  • »
  • Arshad Warsiच्या ट्रान्सफॉर्मेशननं सगळ्यांनाच केलं चकित; आगामी चित्रपटासाठी अभिनेत्याची मेहनत

Arshad Warsiच्या ट्रान्सफॉर्मेशननं सगळ्यांनाच केलं चकित; आगामी चित्रपटासाठी अभिनेत्याची मेहनत

अर्शद वारसी म्हटलं की सर्वप्रथम आपल्या डोळ्यांसमोर येतो तो ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ आणि ‘लगे रहो मुन्नाभाई’ या दोन चित्रपटांमधील त्याचा दमदार विनोदी अभिनय.

  • Share this:
 मुंबई, 18 सप्टेंबर- बॉलिवूडमधील (Bollywood) अनेक अभिनेते आणि अभिनेत्री आपल्या लूक, स्टाईल आणि व्यक्तिमत्त्वाबाबत खूपच संवेदनशील असतात. आपण अधिक प्रभावी आणि चांगलं दिसावं यासाठी ते सातत्यानं प्रयत्न करत असतात. अनेकदा चित्रपटातील भूमिकांसाठीही ते स्वतःमध्ये असे बदल करत असतात. शरीरयष्टी, फॅशन किंवा बदलता लूक याविषयीचे फोटोज किंवा व्हिडीओ ते नेहमीच सोशल मीडियावरून (Social Media) शेअर करत असतात. आपल्या आवडत्या अभिनेता, अभिनेत्रीच्या व्यक्तिमत्वातील बदल हा देखील फॅन्समध्ये चर्चेचा विषय ठरतो. सध्या बॉलिवूड अभिनेता अर्शद वारसी (Bollywood Actor Arshad warsi) याच कारणामुळे जोरदार चर्चेत आहे. अर्शदनं स्वतःमध्ये लक्षणीय ट्रान्सफॉर्मेशन (Transformation) केलं असून, त्याचा नवा लूक आणि ट्रान्सफॉर्मेशन पाहून चाहत्यांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. याविषयीची माहिती `आज तक`नं दिली आहे.
View this post on Instagram

A post shared by Arshad Warsi (@arshad_warsi)

अर्शद वारसी म्हटलं की सर्वप्रथम आपल्या डोळ्यांसमोर येतो तो ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ आणि ‘लगे रहो मुन्नाभाई’ या दोन चित्रपटांमधील त्याचा दमदार विनोदी अभिनय. याशिवाय अर्शदनं अनेक चित्रपटांमधून आपलं अभिनय कौशल्य सिध्द केलं आहे. परंतु, या चित्रपटातील त्यानं साकारलेलं सर्किट (Circuit) हे पात्र आजही लोकांना आवडतं. आगामी काळातील प्रोजेक्टसबाबत अर्शदनं अद्याप खुलासा केलेला नसला तरी त्यानं आगामी ‘बच्चन पांडे’ या चित्रपटाचं शुटिंग पूर्ण केलं आहे. (हे वाचा:'पुन्हा चित्रपटांत कमबॅक कर' करिश्मा कपूरचं सौंदर्य पाहून चाहते पडले प्रेमात!) सध्या अर्शद आपल्या नावीन्यपूर्ण लूकमुळं चर्चेचा विषय ठरला आहे. नुकताच अर्शदनं फिटनेस परफेक्ट (Fitness perfect) दर्शवणारा स्वतःचा एक फोटो सोशल मीडियावर शेअऱ केला आहे. या फोटोतील अर्शदचे बायसेप्स पाहून चाहत्यांनी आश्चर्य व्यक्त केलं असून, या फोटोवर कमेंटसचा पाऊस पडला आहे. सोशल मीडियावर अर्शदनं एकावेळी दोन फोटोज शेअर केले आहेत. एका फोटोत त्यानं गुलाबी शर्ट परिधान करून साइड पोज दिली आहे तर दुसऱ्या फोटोत तो आपले टोन्ड बायसेप्स दाखवत आहे. या छायाचित्राविषयी नमूद करताना अर्शदनं लिहिलं आहे की ``अजून या पुढेही जायचं आहे, पुढील प्रोजेक्टसाठी मी शेपमध्ये येतोय``. विशेष म्हणजे अर्शदचा हा बदलेला लूक पाहून आशिष चौधरी आणि रणवीर सिंहने त्याचं कौतुक करत त्याला प्रोत्साहन दिलं आहे. हे फोटो पाहून अर्शदचे चाहते (Fans) जाम खूष झाले असून, त्याचा लूक पाहून आश्चर्य व्यक्त करत आहेत. (हे वाचा:OMG! ना जिम ना योग जेठालालनं घटवलं 10 किलो वजन; चाहत्यांना सांगितलं सिक्रेट) काही युजर्सनी अर्शदच्या सर्किट या पात्राचं कौतुक केलं आहे. त्यात एक युजर कमेंट करताना लिहितो की ``ए सर्किट तू तर फारच बदललास की``. दुसरा एक युजर लिहितो, की ``सरजी, अशी बॉडी तर जॉन सेनाची पण नाही``. ``असूर कलाकृतीच्या दिग्दर्शकाशी आता थेट लढाई करणार वाटतं,`` अशी प्रतिक्रिया एका युजरनं दिली आहे. एका युजरनं असूरमधील अर्शदच्या पर्सनॅलिटीचं कौतुक करताना म्हटलं आहे की ``अर्शदची पर्सनॅलिटी खूप सुंदर आहे. असूरमधील कॅरॅक्टरसाठी अर्शद सूट होतो. धमालमधील विनोदी भूमिकेतही त्यांनी कमाल केली होती``.एकूण बदललेल्या लूकमुळं अर्शद वारसी सध्या जोरदार चर्चेत असून, चाहत्यांनी त्याच्या फोटोवर कमेंट्सचा अक्षरशः वर्षाव केला आहे.
First published: