Home /News /entertainment /

स्वरा भास्करने तालिबान्यांची केली हिंदुत्वाशी तुलना; होतेय #ArrestSwaraBhaskar ची मागणी

स्वरा भास्करने तालिबान्यांची केली हिंदुत्वाशी तुलना; होतेय #ArrestSwaraBhaskar ची मागणी

सध्या अफगाणीस्तानात (Afghanistan crisis) घडत असलेला हिंसाचार आणि तालिबान्यांचं वर्चस्व यावर अनेक सेलिब्रिटी आवाज उठवत आहेत. मात्र स्वरा भास्करने चक्क हिंदुत्वाची तुलना तालिबानशी केली आहे.

    मुंबई 18 ऑगस्ट : बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर (Swara Bhaskar) नेहमीच आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत राहते. त्यामुळे अनेकदा तिला ट्रोलही केलं जातं. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती नेहमीच आपली वक्तव्यं करत असते. तर यावेळी तिच्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा तिला ट्रोल केलं जात आहे. इतकच नाही तर तिला अटक करण्याची मागणीही केली जात आहे. दरम्यान सध्या अफगाणीस्तानात (Afghanistan crisis) घडत असलेला हिंसाचार आणि तालिबान्यांचं वर्चस्व यावर अनेक सेलिब्रिटी आवाज उठवत आहेत. मात्र स्वरा भास्करने चक्क हिंदुत्वाची तुलना तालिबानशी केली आहे. तिने ट्वीट करत लिहिलं होतं की, ‘आपण हिंदुत्वाच्या दहशतीपासून वाचू शकत नाही आणि आपण तालिबानच्या आतंवादापासून पूर्णपणे तुटलो आहोत. आपण तालिबान्या आतंकवादापासून शांत नाही होऊ शकत आणि आपण सगळे हिंदुत्वाच्या आतंकवादावर नाराज होतो. आपले मानवीय आणि नैतिक मूल्य हे दडपशाहीवर आधारीत नसायला पाहिजे.’ स्वराच्या या ट्वीट नंतर तिला फारच ट्रोल केलं जात आहे. तर तिच्यावर युझर्स फारच संतापले आहेत. अनेकांनी तर तिच्या अटकेचीही मागणी केली आहे. (Users trolled Swara Bhaskar) याशिवाय काहींनी त्वरीत शिक्षा करण्याची मागणीही केली आहे. स्वराने हिंदुंच्या भावना दुखावल्या आहेत, तिला त्वरीत शिक्षा व्हावी असं काही युझर्सनी म्हटलं. तर अनेकांनी स्वराला अफगाणीस्तानात पाठण्याचा सल्ला ही दिला आहे. याशिवाय स्वराला अटक करण्याचा हॅशटॅगही ट्रेंड करायला सुरूवात केली आहे.#ArrestSwaraBhaskar हा ट्रेंड सध्या ट्विटरवर पाहायला मिळत आहे. याआधीही अनेकदा स्वरा भास्कर तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे अडचणीत आल्याचं पाहायला मिळालं होतं.
    Published by:News Digital
    First published:

    Tags: Afghanistan, Entertainment, Hindu, Swara bhaskar, Taliban

    पुढील बातम्या