Home /News /entertainment /

VIDEO: तो एक शब्द पडला भलताच महागात; युविका चौधरीच्या अटकेची होतीये मागणी, अभिनेत्रीनं मागितली माफी

VIDEO: तो एक शब्द पडला भलताच महागात; युविका चौधरीच्या अटकेची होतीये मागणी, अभिनेत्रीनं मागितली माफी

अभिनेत्री युविका चौधरीच्या (Yuvika Choudhary) अटकेची मागणी होत आहे. ट्विटरवर #ArrestUvikaChoudhary हा हॅश्टॅग ट्रेंड करत आहे.

  मुंबई २५ मे : काही दिवसांपूर्वीच तारक मेहता का उल्टा चष्मा फेम अभिनेत्री मुनमुन दत्ताच्या (Munmun Dutta)  अटकेची मागणी काही युझर्सनी केली होती. तर यानंतर आता अभिनेत्री युविका चौधरीच्या (Yuvika Choudhary) अटकेची मागणी होत आहे. ट्विटरवर #ArrestUvikaChoudhary हा हॅश्टॅग ट्रेंड करत आहे. युविका ही टिव्हीची प्रसिद्ध अभिनेत्री आहे. (Yuvika Choudhary video) अनेक मालिकांमधून ती आजवर दिसली आहे. ती नेहमीच नवनवीन व्हिडिओ बनवून पोस्ट करत असते. पण यावेळी तिने व्हिडिओ बनवताना एक शब्द बोलल्याने तिच्यावर अनेकांनी टीका केली आहे. युविका पती अभिनेता प्रिन्स नरुला (Prince Narula)  सोबत एक व्हिडिओ बनवत होती. तेव्हा तिने ‘भंगी’ या शब्दाचा वापर केला आणि त्यानंतर ती ट्रोल होऊ लागली.
  ट्विटरवर अनेकांनी हा व्हिडिओ शेअर करत तिच्यावर टिका केली आहे व हॅश्टॅग ट्रेंड केला आहे. या सगळ्या प्रकारानंतर युविकाने तो व्हिडिओ हटवला असून त्यावर स्पष्टीकरण दिलं आहे.

  प्रियांका चोप्राचं नवं फोटोशूट, हॉट PHOTOS नं वाढवलं सोशल मीडियाचं तापमान

  ती म्हणाली, ‘मला व्हिडिओत वापरलेल्या शब्दाचा अर्थ माहिती नव्हता. तसेच कोणालाही दुखावण्याचा माझा हेतू नव्हता. मी कोणालाही दुखवू शकत नाही. मी सगळ्यांची माफी मागते. मला आशा आहे तुम्ही मला समजून घ्याल , सगळ्यांना खूप प्रेम.’ काही दिवसांपूर्वी असाच प्रकार अभिनेत्री मूनमून दत्ता हिच्यासोबत घडला होता. तिनेही अनावधानाने असाच शब्दप्रयोग केला होता. त्यानंतर तिच्यावर बरीच टीका झाली होती. त्यानंतर तिनेही माफी मागत व्हिडिओ हटवला होता.
  Published by:News Digital
  First published:

  Tags: Entertainment, Television

  पुढील बातम्या