सलमानच्या भाच्यावर ट्रोलर्सनं केलेली 'ती' कमेंट पाहून संतापली अर्पिता खान

अनेकदा काही ना काही कारणानं सेलिब्रेटींच्या मुलांवरही टीका केली जाते. असाच एक किस्सा सलमान खानची बहिण अर्पिता खानच्या मुलाबाबत घडला, पण त्यावर तिने कडक शब्दांत उत्तर देत ट्रोलरला गप्प बसवलं.

News18 Lokmat | Updated On: Apr 4, 2019 02:48 PM IST

सलमानच्या भाच्यावर ट्रोलर्सनं केलेली 'ती' कमेंट पाहून संतापली अर्पिता खान

मुंबई, 04 मार्च : सोशल मीडियावर सेलिब्रेटींना ट्रोल करणं काही नवी गोष्ट नाही. मग त्यांचा लूक असो किंवा ड्रेस किंवा मग अजून कोणतं कारण. ट्रोलर्स फक्त सेलिब्रेटींवर टीका करण्याची संधी शोधत असतात. एवढंच नाही तर काही सेलिब्रेटींच्या मुलांवरही टीका केली जाते. त्यामुळे बॉलिवूडचे जवळजवळ सर्वच कलाकार सध्या या ट्रोलर्सना वैतागलेले आहेत. असचं काहीसं घडलं आहे सलमान खानची बहिण अर्पिता खान सोबत. एका ट्रोलरनं अर्पिताचा मुलगा अहिलवर अशी काही कमेंट केली की, ती कमेंट पाहून अर्पिता संतापली आणि तिनं त्याला सडेतोड उत्तरही दिलं.
 

Loading...

View this post on Instagram
 

Cute ❤️❤️❤️ nana #salimkhan celebertes baby #ahilsharma birthday


A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on

नुकताच अर्पितानं मुलगा अहिलचा वाढदिवस साजरा केला. त्यावेळचा एक व्हिडीओ तिनं इन्स्टाग्रामवर शेअर केला. या व्हिडीओमध्ये अहिल डायनिंग टेबलवर बसला असून त्याच्यासोबत त्याचे आजोबा म्हणजे सलमानचे वडील सलीम खान केक कापताना दिसत आहेत. अर्पिताचा हा व्हिडीओ फोटो जर्नलिस्ट विरल भयानी यांनीही शेअर केला होता. या व्हिडीओवर एका युझरनं या मुलाला पोलिओ झाला असं वाटत आहे अशी कमेंट केली होती. यावर अर्पिताचा राग अनावर झाला आणि तिनं त्या व्यक्तीला सडेतोड उत्तरही दिलं.

युझरला उत्तर देताना आर्पितानं लिहिलं, 'तुम्ही खूप वाईट माणसं आहात. कमीत कमी लहान मुलांना तरी तुमच्या नकारात्मक कमेंटपासून दूर ठेवा.' त्यानंतर अनेकांनी अर्पिताचं समर्थन केलं. काहींनी लिहिलं, हे लोक अतिशय निर्लज्ज आहेत. त्यामुळे तुम्ही त्यांच्या कमेंटवर लक्ष देऊ नका. पण यानंतर मात्र त्या युझरनं शांत राहाणं पसंत करत त्याची कमेंटही डिलिट केली. अर्पितानं अशाप्रकारे सोशल मीडियावर व्यक्त होण्याची ही पहिलीच वेळ नाही. 2016 मध्ये तर अर्पितानं जाहीर पत्र लिहीत आपल्या चाहत्यांना ट्रोलर्सच्या कमेंटवर लक्ष न देण्याचा सल्ला दिला होता.
 

View this post on Instagram
 

My life in one frame😍 My brother & My son. Thank you god for the choicest blessing 🙏


A post shared by Arpita Khan Sharma (@arpitakhansharma) on
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 4, 2019 02:48 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...