VIDEO: जेव्हा नातवासाठी सलीम खान घोडा होतात..

VIDEO: जेव्हा नातवासाठी सलीम खान घोडा होतात..

सलमान खान अनेकदा त्याच्या सिनेमांमुळे आणि इतर वादांमुळे चर्चेत असतो. आता त्याच्या वडिलांनी अर्थात सलीम खान यांनी त्याला यातही मागे टाकलं आहे.

  • Share this:

सलमान खान अनेकदा त्याच्या सिनेमांमुळे आणि इतर वादांमुळे चर्चेत असतो. आता त्याच्या वडिलांनी अर्थात सलीम खान यांनी त्याला यातही मागे टाकलं आहे. काही दिवसांपूर्वी सलीम खान कपिल शर्माच्या शोमध्ये आले होते. यावेळी सलीम यांनी त्यांच्या करिअरमधील आणि खासगी आयुष्यातील अनेक गोष्टी शेअर केल्या.

आता सलीम खान यांचा अजून एक व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ सलीम यांची मुलगी अर्पिता खान शर्माने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे. या व्हिडिओत सलीम खान त्याच्या नातवाला पाठीवर घेऊन खेळवताना दिसत आहेत. सलीम खान यात घोडा झाले असून आहिल त्यांच्या पाठीवर बसला आहे.या व्हिडिओला आतापर्यंत लाखो लाइक्स मिळाले असून अनेकांनी हा व्हिडिओ शेअरही केला आहे. अर्पिताने या व्हिडिओला कॅप्शन देताना म्हटले की, ‘८३ वर्षांचे माझे बाबा आहिलसोबत खेळताना त्यांना पाहणं फार सुंदर आहे. असेच ते आमच्यासोबत खेळले पण मला आठवत नाही. मात्र हे आयुष्यभर लक्षात राहिल. धन्यवाद बाबा/आजोबा.’

आहिल हा खान कुटुंबातला सर्वात लाडका नातू आहे. सलमानही अनेकदा आहिलसोबत वेळ घालवताना दिसतो. फक्त सलमानच नाही तर अरबाज आणि सोहेलही आहिलवर स्वतःपेक्षा जास्त प्रेम करतात. अर्पिता सलीम आणि हेलेन यांची मुलगी हे. ती स्वतः सोशल मीडियावर फार सक्रिय असते.अर्पिताने २०१४ मध्ये आयुष शर्माशी लग्न केलं. आयुष सुरुवातीला वडिलांचा व्यवसाय सांभाळायचा. मात्र आता आयुषने सलमान खानच्या प्रोडक्शनमध्ये बनलेली लवयात्री सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फारसा चालला नाही.

Special Report : अनेक नेते काँग्रेसमध्ये परतीच्या वाटेवर; राणेंनाही साकडं?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 20, 2019 04:44 PM IST

ताज्या बातम्या