अर्पिताने भाऊ सलमानसाठी लिहिली 'ही' भावनिक पोस्ट!

अर्पिताने भाऊ सलमानसाठी लिहिली 'ही' भावनिक पोस्ट!

र्पिताच्या या पोस्टमधून या बहीण-भावाच्या नात्यातील गोडवा पुन्हा एकदा दिसून आला आहे.

  • Share this:

11 एप्रिल : दबंग खान सलमानने एक भावूक पोस्ट ट्विट केल्यानंतर दुसरीकडे त्याची बहीण अर्पिता खानने देखील त्याच्या फोटोसह एक पोस्ट केलीये. 'माझी ताकद, माझा गर्व, आनंद, आयुष्य, जग सर्वकाही तूच आहेस' असं अर्पिताने या पोस्टमध्ये लिहिलंय. भाऊ सलमानच्या आयुष्यात फक्त आनंद असावा अशी अपेक्षा देखील तिने व्यक्ते केलीये.

सलमान आणि अर्पितामधील प्रेम प्रत्येकवेळी स्पष्टपणे दिसून येतं. पण अर्पिताच्या या पोस्टमधून या बहीण-भावाच्या नात्यातील गोडवा पुन्हा एकदा दिसून आला आहे.

सलमानसोबत या कठीण प्रसंगात त्याच्या दोन्ही बहिणी उभ्या होत्या. अलविरा आणि अर्पिता या दोघींनीही आपल्या भावाची साथ सोडली नव्हती. सलमान कारागृहातून सुटल्यावर अर्पिताने सोशल मीडियावर त्याच्या फोटोसह एक पोस्ट केली. ज्यामध्ये तिने भावाप्रतीच्या भावनांना वाट मोकळी करुन दिली.

अर्पिता आणि सलमानच्या नात्याविषयी वेगळं काहीच सांगण्याची गरज नाही. ती सलमानची सर्वात लाडकी बहीण असून, अनेकदा या भाऊ-बहिणीच्या नात्यातील गोडवा चाहत्यांना पाहायला मिळाला आहे.

 

First published: April 11, 2018, 10:05 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading