अर्जुन रामपाल आणि मेहेर 20 वर्षांच्या संसारानंतर घेणार घटस्फोट

अर्जुन रामपाल आणि मेहेर 20 वर्षांच्या संसारानंतर घेणार घटस्फोट

अर्जुन आणि मेहेर रामपाल ह्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतलाय. लग्नानंतर 20 वर्षांनी त्यांनी हा निर्णय घेत असल्याचे एका पत्रकाद्वारे जाहीर केलंय.

  • Share this:

28 मे : अर्जुन आणि मेहेर रामपाल ह्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतलाय. लग्नानंतर 20 वर्षांनी त्यांनी हा निर्णय घेत असल्याचे एका पत्रकाद्वारे जाहीर केलंय. त्यांना माहिका आणि मायरा अशा दोन मुली आहेत. एकमेकांपासून वेगळे होत असलो तरीही एकमेकप्रति असलेले प्रेम आणि आदर कायम राहणार असल्याचं त्यांनी म्हटलंय.

मुलींना जेव्हा कधी आमची गरज असेल तेव्हा नक्की आम्ही त्यांच्या सोबत असू असंही त्यांनी स्पष्ट केलंय. हृतिक रोशन आणि सुझान रोशन वेगळे झाले तेव्हा अर्जुन रामपाल त्यासाठी कारणीभूत असल्याची चर्चा रंगली होती. मात्र हृतिक आणि सुझान पुन्हा एकत्र आले असतानाच अर्जुनचा मात्र घटस्फोट झालाय.

काय म्हटलंय अर्जुननं?

प्रेम आणि सुंदर आठवणींनी भरलेल्या 20 वर्षांच्या सुंदर प्रवासानंतर आम्ही दोघांनी वेगवेगळ्या वाटेनं जायचं ठरवलं आहे. नवा प्रवास सुरू केल्यावरही आम्ही एकमेकांच्या पाठीशी ठामपणे उभे असू. हे निवेदन प्रसिद्ध करताना खूप विचित्र वाटतंय, पण परिस्थितीच तशी ओढावली आहे. आमचं एकमेकांवरचं प्रेम कायम आहे. आमच्या मुली माहिका आणि मायरा यांच्यासाठी आम्ही नेहमीच उपलब्ध असू. अशा वेळी आमच्या खासगीपणाचा मान राखावा, अशी आम्ही विनंती करतो. सर्वांच्या पाठिंब्यासाठी आभार.

नाती संपतात पण आयुष्य सुरू राहतं. यावर अधिक भाष्य आम्ही करणार नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 28, 2018 11:31 AM IST

ताज्या बातम्या