मुंबईच्या रस्त्यावर भेळपुरी खाताना दिसली अर्जुन रामपालची प्रेग्नंट गर्लफ्रेंड

मुंबईच्या रस्त्यावर भेळपुरी खाताना दिसली अर्जुन रामपालची प्रेग्नंट गर्लफ्रेंड

गॅब्रिएला ही दक्षिण आफ्रिकेची मॉडेल असून 2009मध्ये एफएचएमच्या जगातील 100 मादक महिलांमध्ये तिची निवड करण्यात आली होती.

  • Share this:

मुंबई, 17 जुलै : बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपाल सध्या त्याच्या गर्लफ्रेंडमुळे चांगलाच चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी त्याने त्याची गर्लफ्रेंड गॅब्रिएला डेमेट्रिएड्स गरोदर असल्याची पोस्ट सोशल मीडियावर केली होती. त्यानंतर या दोघांना अनेकदा एकत्र स्पॉट केलं गेलं. अर्जुन एका चांगल्या प्रियकरासारखा सध्या गॅब्रिएलाची पूर्ण काळजी घेताना दिसला. दोघांना मुंबईत एका क्लिनिकच्या बाहेर पडताना पाहण्यात आलं होतं. त्यानंतर आता ती पुन्हा एकदा मुंबईच्या रस्त्यावर स्पॉट झाली आहे. मात्र तिच्यासोबत अर्जुन नव्हता. यावेळी ती भेळपुरी विकत घेताना दिसली.

गॅब्रिएला सध्या प्रेग्नंसीचा काळ एंजॉय करत आहे. अनेकदा प्रेग्नंसीमध्ये महिलांना वेगवेगळ्या गोष्टी खाव्याशा वाटतात. कदाचित गॅब्रिएलाच्या बाबतीत असंच काहीसं झालं असावं. त्यामुळे ती स्टारडमचा विचार न करता भेळपुरीवाल्याकडून भेळपुरी घेताना दिसली. यावेळी ती एकदम कॅज्यूअल लुकमध्ये होती. साध्या आणि सिंपल लुकमध्येही गॅब्रिएला खूप सुंदर दिसत होती.  लग्नाआधीच प्रेग्नंट असल्यानं अर्जुन आणि गॅब्रिएला मागच्या काही खूप चर्चेत आहेत. काही दिवसांपूर्वी तिच्या बेबी शॉवरचे फोटो सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यानंतर आता रस्त्यावर भेळपुरी घेतानाचे तिचे फोटो सध्या सगळीकडे व्हायरल होत आहे.

'दबंग 3'च्या शूटिंगसाठी सलमान खान बारामतीत, एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी

अर्जुन आणि गॅब्रिएलानं अद्याप लग्न केलेलं नाही मात्र बाळाच्या जन्मानंतर हे दोघं लग्न करतील असा अंदाज आहे. अर्जुन तिसऱ्यांदा बाबा होणार असून त्याला पहिली पत्नी मेहरपासून त्याला दोन मुली आहेत. गॅब्रिएलाच्या प्रेग्नंसीमध्ये अर्जुन तिची वेळोवेळी खूप काळजी घेताना दिसतो. 2018 मध्ये अर्जुनने गर्लफ्रेंड गॅब्रिएलासोबतचं आपलं नातं अधिकृत केलं होतं. अर्जुनचा मेहर जेसियाशी घटस्फोट झाला असून त्या दोघांना दोन मुली आहेत. शिवाय मेहरला गॅब्रिएलाच्या प्रेग्नंसीशी काहीही देणघेणं नाही असंही ती म्हणाली.

दीपिकाची बहिणीसोबत Wimbledon Final ला हजेरी, कोण आहे अनिशा पदुकोण

 

View this post on Instagram

 

Blessed to have you and start all over again....thank you baby for this baby 👶🏽

A post shared by Arjun (@rampal72) on

Gabriella ही दक्षिण आफ्रिकेची मॉडेल आहे. तिने 2009मध्ये मिस इंडियन प्रिमिअर लीगमध्ये भाग घेतला होता आणि एफएचएमच्या जगातील 100 मादक महिलांमध्ये तिची निवड करण्यात आली होती. तिला खरी ओळख मिस IPL बॉलिवूड हा किताब जिंकल्यानंतर मिळाली. डेक्कन चारर्जसला ती रीप्रेझेंट करत होती. याशिवाय तिने काही सिनेमांमध्ये आणि म्युझिक व्हिडीओमध्येही दिसली होती.

प्रभासच्या 'साहो'चं प्रदर्शन लांबणीवर, आता ‘या’ दिवशी होणार रिलीज

===============================================================

SPECIAL REPORT: टेमघर धरणाची गळती थांबली? जलसिंचन विभागाच्या दाव्याची पोलखोल

First published: July 17, 2019, 1:08 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading