लहान मुलाला सोडून लंच डेटला गेली 'ही' बॉलिवूड जोडी

लहान मुलाला सोडून लंच डेटला गेली 'ही' बॉलिवूड जोडी

विशेष म्हणजे अर्जुन रामपाल आणि त्याच्या पत्नीचा अजूनपर्यंत घटस्फोट झालेला नाही. पण दोघंही परस्पर संमतीने एकत्र राहत नाहीत.

  • Share this:

मुंबई, 05 ऑगस्ट- बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपाल नुकताच त्याच्या गर्लफ्रेंड गॅब्रिएला डेमेट्रिएड्ससह लंच डेटला जाताना दिसला. विशेष म्हणजे यावेळी त्यांच्यासोबत त्यांचं बाळ नव्हतं. काही दिवसांपूर्वी अर्जुनच्या गर्लफ्रेंडने मुलाला अरिकला जन्म दिला. विशेष म्हणजे अर्जुन रामपाल आणि त्याच्या पत्नीचा अजूनपर्यंत घटस्फोट झालेला नाही. पण दोघंही परस्पर संमतीने एकत्र राहत नाहीत. दोघांच्या घटस्फोटाचं प्रकरण न्यायालयात आहे.

 

View this post on Instagram

 

#arjunrampal with @gabriellademetriades snapped #in #bandra #today #yogenshah @yogenshah_s #bollywood #Entertainment #paparazzi @rampal72

A post shared by yogen shah (@yogenshah_s) on

दरम्यान अर्जुनची ओळख गॅब्रिएला डेमेट्रिएड्सशी झाली. दोघांनी एकमेकांना डेट करायला सुरुवात केली. लिव्ह इनमध्ये राहताना दोघांनी फॅमिली प्लॅनिंग केलं. काही दिवसांपूर्वीच गॅब्रिएलाने मुलाला जन्म दिला. यावेळी दक्षिण आफ्रिकेची प्रसिद्ध मॉडेल असलेल्या गॅब्रिएलाचे आई- वडीलही खास मुंबईत मुलीसोबत रहायला आले होते. सध्या अर्जुन आपल्या या नवीन कुटुंबासोबत चांगला वेळ घालवत आहे. त्यामुळे तो त्याच्या सिनेमांपेक्षा खासगी आयुष्यामुळेच जास्त चर्चेत राहत आहे.

अर्जुन कपूर शेवटचा पलटन सिनेमात दिसला होता. यानंतर तो द फायनल कॉलमध्येही दिसला होता. लवकरच तो त्याच्या आगामी सिनेमाच्या चित्रीकरणाची तयारी करेल. मात्र सध्या तो त्याचा पूर्ण वेळ मुलगा अरिक आणि गर्लफ्रेंडला देत आहे. काही दिवसांपूर्वी त्याने मुलासोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. यानंतर त्याचा गर्लफ्रेंड आणि मुलाला रुग्णालयातून घरी नेतानाचे फोटो व्हायरल झाले होते.

लोक म्हणायचे काही दिवसही टिकणार नाही अजय- काजोलचं लग्न, आज आहे ‘हिट कपल'

एक्स वहिनी, भाऊ, एक्स गर्लफ्रेंड, गर्लफ्रेंडची बहीण; कोणाकोणाची मदत करणार सलमान

या बॉलिवूड अभिनेत्याने ‘जंगला’त केलं न्यूड फोटोशूट, ज्वाला गुट्टाने बंद केले डोळ

VIDEO: नेते नजरकैदेत, कलम 144 लागू; काय आहे जम्मूची आताची स्थिती?

Published by: Madhura Nerurkar
First published: August 5, 2019, 10:29 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading