• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • Drugs Case: अभिनेता अर्जुन रामपालच्या मेहुण्याला गोव्यात झाली अटक

Drugs Case: अभिनेता अर्जुन रामपालच्या मेहुण्याला गोव्यात झाली अटक

नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो(NCB)ने अभिनेता अर्जुन रामपालची(Arjun Rampal) गर्लफ्रेंड ग्रॅबेलिया डेमेट्रियड्सच्या (Gabriella Demetriades)भावाला अटक केली आहे.

 • Share this:
  मुंबई, 25 सप्टेंबर- नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो(NCB)ने अभिनेता अर्जुन रामपालची(Arjun Rampal) गर्लफ्रेंड ग्रॅबेलिया  डेमेट्रियड्सच्या  (Gabriella Demetriades)भावाला अटक केली आहे. अगिसिलाओस डेमेट्रियड्सला मुंबई आणि गोव्याच्या एनसीबी टीमने एकत्र येऊन त्याला शनिवारी गोव्यामध्ये अटक करण्यात आली आहे. न्यूज एजन्सी एएनआयच्या ट्विटनुसार, केंद्रीय एजन्सीने त्याच्याजवळ गांजा आढळून आल्याचंही म्हटलं आहे. याआधीसुद्धा बॉलिवूड ड्रग केसमध्ये त्याला ऑक्टोबर २०२० मध्ये NCB ने अटक केली होती. अगिसिलाओस हा एक दक्षिण आफ्रिकी नागरिक आहे. गेल्यावर्षी NCBने अगिसिलाओसजवळ  हशीष आणि एल्प्राजोलमच्या टॅबलेट्स आढळून आल्या होत्या. ड्रग्स पेडलर्सच्या केसनंतर अगिसिलाओस डेमेट्रियड्सच्या ड्रग्स विक्रीचं प्रकरण समोर आलं होतं. गेल्यावर्षी ड्रग्स प्रकरणामध्ये NCBने अगिसिलाओसच्या आधी तब्बल २२ जणांना अटक केली होती. (हे वाचा:PM मोदींच्या अमेरिका दौऱ्यावर राखी सावंतने केली खास डिमांड; पाहा मजेशीर VIDio ) ANI ट्विट- NCB च्या सूत्रांनुसार, ऑक्टोबर २०२० मध्ये अगिसिलाओस डेमेट्रियड्सचा संबंध त्या ड्रग्स विक्रेत्यांशी आला होता, ज्यांना NCB ने आधी अटक केली होती. NCB चे अधिकारी समीर वानखेडे यांनी ई  टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं होतं, 'अटक करण्यात आलेला  अगिसिलाओस डेमेट्रियड्स बॉलिवूड सुशांत सिंह रजपूत ड्रग्स केसच्या ड्रग्स पेडलर्सच्या संपर्कात होता.
  Published by:Aiman Desai
  First published: