लग्नाआधीच अर्जुन रामपाल पुन्हा झाला बाबा, गर्लफ्रेंडने दिला मुलाला जन्म

लग्नाआधीच अर्जुन रामपाल पुन्हा झाला बाबा, गर्लफ्रेंडने दिला मुलाला जन्म

गेल्या वर्षभरापासून अर्जुन आणि गॅब्रिला एकमेकांना डेट करत होते. मात्र एप्रिल महिन्यात अर्जुनने त्याची प्रेयसी गरोदर असल्याची घोषणा केली होती.

  • Share this:

मुंबई, 18 जुलै- बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपाल तिसऱ्यांदा बाबा झाला आहे. अर्जुनला पहिल्या बायकोपासून मेहर जेसिआपासून मायरा आणि माहिका या दोन मुली आहेत. आता त्याच्या गर्लफ्रेंडने गॅब्रिला डेमेट्रिएड्स मुलाला जन्म दिला. अर्जुन रामपालने जेपी दत्ताच्या पलटन सिनेमात शेवटचं काम केलं होतं. दत्ता यांची मुलगी निधीने सोशल मीडियावर अर्जुन आणि गॅब्रिलाला नव्या बाळाच्या जन्माबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत. निधीने लिहिले की, ‘नव्या मुलाच्या आगमनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. देव तुमचं कल्याण करो.’

गेल्या वर्षभरापासून अर्जुन आणि गॅब्रिला एकमेकांना डेट करत होते. मात्र एप्रिल महिन्यात अर्जुनने त्याची प्रेयसी गरोदर असल्याची घोषणा केली होती. यानंतर अर्जुनने त्याच्या दोन्ही मुलींना गॅब्रिलाचा कुटुंबातील एक सदस्य म्हणून स्वीकारही केल्या असल्याचं अर्जुनने सांगितलं. बुधवारी संध्याकाळी गॅब्रिलाला रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी अर्जुन आणि ती स्वतः रुग्णालयात गेले. यावेळी गॅब्रिलाचे आई- वडिलही खास साऊथ आफ्रिकेवरून मुंबईत आले. मुलीसोबत जास्तीत जास्त वेळ घालवण्यासाठी दोघं खास मुंबईत आले.

अर्जुन रामपाल आणि त्याची एक्स पत्नी मेहर जेसिआने त्यांच्या लग्नाच्या २० वर्षांनंतर घटस्फोट घेतला. अर्जुन आणि मेहरच्या या निर्णयामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला होता. बी- टाउनमध्ये तर दोघांच्या नात्यांबद्दल अनेक प्रकारच्या गोष्टी बोलल्या जात होत्या. असं म्हटलं जातं की, दोघांच्या नात्यात दुरावा आल्यानंतर अर्जुनने घर सोडलं होतं आणि तो काही दिवस भाड्याच्या घरात राहायचा. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अर्जुन आणि मेहरचं आदल्या रात्री कडाक्याचं भांडण झालं. या भांडणानंतर दोघांनी दुसऱ्या दिवशी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला.

घटस्फोटाचा निर्णय घेण्यासाठी दोघांनी फार वेळ लावला. यामागे कारण होतं त्यांच्या दोन मुली मायरा आणि माहिका. दोघांनाही वाटत होतं की, त्यांच्या मुलींना घटस्फोटाचा अर्थ कळावा. सुरुवातीला अर्जुनच्या घटस्फोटाचं कारणं हृतिकची पत्नी सुझेन खान असल्याचं म्हटलं जात होतं.

एक दिवस मेहरला कळलं की अर्जुन आणि सुझान भेटतात त्यावरून त्या दोघांमध्ये मोठा वाद झाला होता. या रिपोर्टमध्ये सूत्रांच्या अहवालाने म्हटलं की, ‘मेहर- अर्जुनमधलं नातं दिवसेंदिवस खराब होत चाललं होतं. २०१६ मध्ये पहिल्यांदा अर्जुन स्वतःचं घर सोडून भाड्याच्या घरात राहायला गेला.’ या जोडप्याच्या जवळील एका फिल्ममेकरने सांगितले की, ‘दोघं फार जोरात भांडत होती आणि एकमेकांवर सामान फेकत होते. त्यांच्या या भांडणाला वैतागून शेजाऱ्यांनी पोलिसांना बोलावण्याची धमकी दिली. हे काही त्यांचं पहिलं भांडणं नव्हतं. यानंतर मेहरने शेजाऱ्यांची लगेच माफी मागितली तर अर्जुन दुसऱ्या दिवसापासून दुसऱ्या ठिकाणी राहायला गेला.’

 

View this post on Instagram

 

When you wake up to this, you know you are blessed. #Maldives #anantaraveli #thelife

A post shared by Arjun (@rampal72) on

या भांडणानंतर अर्जुन आणि मेहर यांचे रस्ते कायमसाठी वेगळे झाले. दुसऱ्याच दिवशी दोघांनी सोशल मीडियावर स्टेटमेन्ट शेअर करत म्हटलं की, ’२० वर्षांचा प्रवास फार सुंदर आणि अविस्मरणीय होता. पण प्रत्येक रस्त्याचे मार्ग वेगवेगळे असतात. आम्हाला वाटतं की, एकमेकांपासून दूर जाऊन आणि मार्ग वेगळे करण्याची हीच योग्य वेळ आहे.’

लग्नाआधीच अभिनेत्री राहिल्या होत्या गरोदर, लोकांना कळल्यावर उचललं ‘हे’ पाऊल

बिकीनी घातली नाही म्हणून अभिनेत्रीचं झालं कोट्यवधीचं नुकसान

'या' अभिनेत्रीने एक्स पतीला दिल्या दुसऱ्या लग्नाच्या शुभेच्छा, म्हणाली...

कतरिनाच्या फोटोची अर्जुन कपूरने उडवली खिल्ली, मनोरंजन विश्वातील टॉप घडामोडी

First published: July 18, 2019, 3:09 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading