गर्लफ्रेंडसाठी अर्जुन रामपालनं पत्नीला दिला घटस्फोट, 21 वर्षांचा संसार मोडला

गर्लफ्रेंडसाठी अर्जुन रामपालनं पत्नीला दिला घटस्फोट, 21 वर्षांचा संसार मोडला

अभिनेता अर्जुन रामपाल आणि त्याची पत्नी मेहर जेसिया हे ऑफिशिअली वेगळे झाले आहेत.

  • Share this:

मुंबई, 21 नोव्हेंबर : बॉलिवूडमध्ये नाती जुळायला आणि तुटायला वेळ लागत नाही.पण ज्यावेळी अनेक वर्ष संसार करुन बॉलिवूडचे सेलिब्रेटी वेगळे होतात. त्यावेळी त्याच्या चाहत्यासाठी हे कोणत्याही धक्क्यापेक्षा कमी नसतं. अभिनेता अर्जुन रामपाल आणि त्याची पत्नी मेहर जेसिया हे ऑफिशिअली वेगळे झाले आहेत. एकमेकांच्या संमतीनंतर फॅमिली कोर्टानं या दोघांचा घटस्फोट मंजूर केला आहे आणि यासोबत मेहर-अर्जुन यांचा 21 वर्षांचा संसार अखेर मोडला. मुंबई मिररनं दिलेल्या वृत्तानुसार न्यायाधीश शैलजा सावंत यांनी स्पेशल मॅरेज अ‍ॅक्टनुसार घटस्फोटाला मान्यता दिली. अर्जुन रामपालनं मेहरशी घटस्फोट घेण्यामागे त्याची गर्लफ्रेंड गॅब्रिएला कारणीभूत असल्याचं बोललं जातं.

अर्जुन आणि मेहर यांच्यातील वाद 2011मध्ये पहिल्यांदा समोर आले होते. त्यानंतर 2018 मध्ये या दोघांनीही वेगळे होत असल्याची घोषणा केली होती. तर अर्जुन आणि त्याची गर्लफ्रेंड गॅब्रिएला यांची ओळख 2009 मध्ये एका इव्हेंटमध्ये झाली होती. त्यानंतर त्यांच्यातील जवळीक वाढत गेली आणि त्यामुळेच मेहर आणि अर्जुनमध्ये वाद होऊ लागले. 2018 मध्ये वेगळे होत असल्याची घोषणा केल्यानंतर अर्जुन भाड्याच्या घरात शिफ्ट झाला होता.

आराध्याच्या बर्थडे पार्टीचे PHOTO VIRAL, 'या' कारणानं ट्रोल झाली ऐश्वर्या

 

View this post on Instagram

 

The luckiest Dad in town. Thank you girls for such special memories. Thank you @subisamuel for these precious images. Thank you @htbrunch for our first interview together. Very special. #happyfathersday to all you dads out there. @jamalshaikh and @karishmaupadhyay for the lovely words.

A post shared by Arjun (@rampal72) on

मेहर आणि अर्जुन 1998 मध्ये लग्नाच्या बेडीत अडकले होते. या दोघांना मिहिका आणि मायरा अशा दोन मुलीसुद्धा आहेत. अर्जुन-मेहरनं 30 एप्रिल 2019 मध्ये घटस्फोटासाठी अर्ज केला होता. त्यानंतर त्यांना आता घटस्फोट मंजूर झाला असून त्यांच्या दोन्ही मुलींची कस्टडी मात्र आई मेहरला देण्यात आली आहे. घटस्फोटानंतर अर्जुन गर्लफ्रेंड गॅब्रिएलाशी लग्नाच्या बेडीत अडकण्याची शक्यता आहे. पण त्यांच्या लग्नाची कोणतीही अधिकृत माहिती अद्याप मिळालेली नाही.

या महिलेच्या आवाजापुढे तर रानू मंडल सुद्धा फेल! पाहा VIRAL VIDEO

अर्जुन गॅब्रिलएलाच्या लव्ह स्टोरी बद्दल बोलायचं तर या दोघांची ओळख 2009 च्या आयपीएल आफ्टर पार्टीमध्ये झाली होती. त्यानंतर काही वर्षांनी त्यांनी एकमेकांना डेट करायला सुरुवात केली. काही दिवसांपूर्वीच गॅब्रिएलानं अर्जुनच्या मुलाला जन्म दिला. मुलाचं नाव त्यांनी अरिक असं ठेवलं आहे.

'हॉट' आणि 'बोल्ड' सीनही वाचवू शकले नाही या अभिनेत्रींचं करिअर

==============================================================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 21, 2019 01:34 PM IST

ताज्या बातम्या