डोक्याला शॉट! 'प्लीज फोन करू नका, मी सनी लिओनी नाही'

डोक्याला शॉट! 'प्लीज फोन करू नका, मी सनी लिओनी नाही'

सनीच्या सिनेमातील एका सीनमुळे तिच्या एका चाहत्याला मात्र मनस्ताप सहन करावा लागत आहे.

  • Share this:

मुंबई, 30 जुलै : अभिनेत्री सनी लिओनीनं आतापर्यंत बॉलिवूडमध्ये स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. तसेच तिचा जगभरात स्वतःचा वेगळा असा चाहता वर्ग आहे. पण सनीच्या सिनेमातील एका सीनमुळे तिच्या एका चाहत्याला मात्र मनस्ताप सहन करावा लागत आहे. दिल्लीच्या एका युवकाला सतत सनी लिओनीसाठी विचारणा करणारे फोन कॉल्स येत आहेत. ज्यामुळे त्याला खूप त्रास सहन करावा लागला आहे. हा युवक सर्वांना हा नंबर सनीचा नाही तर माझा आहे असं सांगून थकला आहे पण हे फोन कॉल्स थांबायचं नाव घेत नाहीत.

सनी लिओनीचा ‘अर्जुन पटियाला’ हा सिनेमा नुकताच रिलीज झाला. या सिनेमातील एका सीनमध्ये सनी तिचा नंतर सांगताना दिसते. मात्र योगायोगानं हा नंबर दिल्लीतील एका युवकाचा निघाला आणि यामुळे जगभरातील अनेकांनी या युवकाला कॉल करून सनी लिओनीबद्दल विचरायला सुरुवात केली. या युवकाचं नाव पुनीत अग्रवाल असून अनेकदा समजावूनही लोकांनी त्याला त्रास देणं सुरूच ठेवलं आहे. त्यमुळे पीडित युवकानं आता पोलिसांत धाव घेतली आहे.

दाऊदच्या जवळीकीमुळे सर्वस्व गमावलं, आज सर्वांपासून दूर आहे राज कपूर यांची ‘गंगा’

 

View this post on Instagram

 

Love being a mermaid!!

A post shared by Sunny Leone (@sunnyleone) on

अर्जुन पटियाला या सिनेमामध्ये सनी पाहुण्या कलाकराच्या भूमिकेत आहे. हा सिनेममा मागच्या शुक्रवारी म्हणजेच 26 जुलैला रिलीज झाला होता. यानंतर पुनीतला कॉल यायला सुरुवात झाली. पुनीतनं कॉलर्सना विचारल्यावर त्यांनी सनी लिओनी सिनेमामध्ये हा तिचा नंबर सांगत असल्याचं उत्तर मिळालं. यामुळे त्रासलेल्या पुनीतनं आता मौर्या एन्क्लेव्ह पोलिस ठाण्यात याविषयीची तक्रार केली आहे. एखाद्या व्यक्तीच्या परवानगी शिवाय त्याचा नंबर वापरता येत नाही असं पुनीतचं म्हणणं आहे.

देसी गर्लसाठी डोकेदुखी ठरलं मियामी व्हेकेशन, सर्वच फोटो ठरले वादग्रस्त

पुनीत म्हणाला, प्रत्येक कॉलवर मला सनी लिओनी बद्दल विचारलं जात आहे. मी प्रत्येक वेळी हे समजावण्याचा प्रयत्न करतो की मी पुनीत आहे आणि हा माझा नंबर आहे. सनीची नाही. मात्र त्यानंतर लोक अश्लील भाषा वापरायला सुरुवात करतात. यामुळे पुनीतनं आता पोलिसांची मदत घेतली आहे. या प्रकरणाची पोलिस सध्या चौकशी करत असून त्यानंतर संबंधितांवर योग्य कारवाई केली जाणार असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं.

VIDEO मलायकावरच्या प्रेम अर्जुननं असं केलं जाहीर? टॅटूचा फोटो VIRAL

=========================================================

आला रे आला..गुजराती 'सिंबा' आला, खऱ्या पोलिसाचा VIDEO तुफान व्हायरल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 30, 2019 12:10 PM IST

ताज्या बातम्या