Home /News /entertainment /

अर्जुन कपूरचा मेसेज वाचून Malaika Arora झाली लाजून चूर; लिहिले होते 'हे' तीन शब्द

अर्जुन कपूरचा मेसेज वाचून Malaika Arora झाली लाजून चूर; लिहिले होते 'हे' तीन शब्द

'सुपर मॉडेल ऑफ द इयरच्या' एका भागामध्ये मलायका आपल्या जोडीदाराबद्दल बिनधास्त बोलताना दिसली. अर्जुनने लिहलेला मेसेज ती वाचत होती. यावेळी ती लाजून चूर झाली. हा तीन शब्दाचा मेसेज काय होता.

    मुंबई, 22 सप्टेंबर 2021 ; अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) आणि अभिनेता अर्जुन कपूर (Arjun Kapoor) हे बॉलिवूडमधील सेलेब्रिटी कपल सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. गेल्या काही काळापासून दोघेजण रिलेशनशिपमध्ये असून ते एकमेकांसोबत वेळ घालवताना अनेकदा दिसतात. तसेच आपल्या प्रेमाबद्दल ते सोशल मीडियातून खुलेपणाने बोलत असतात. नुकतेच 'सुपर मॉडेल ऑफ द इयरच्या' एका भागामध्ये मलायका आपल्या जोडीदाराबद्दल बिनधास्त बोलताना दिसली. अर्जुनने लिहलेला मेसेज ती वाचत होती. यावेळी मेसेजमधील एक शब्द वाचताना ती लाजून चूर झाली. सुपरमॉडल ऑफ द इयर या शोमध्ये मलायका अरोरा ही परीक्षकाच्या भूमिकेत आहे. तिच्यासोबत अभिनेता मिलिंद सोमनही आहे. स्टेजवर दोघांमध्ये क्रश आणि लव्ह लाईफबद्दल चर्चा सुरू होती. यावेळी मलायकाने अर्जुनचा एक मेसेज वाचून दाखवला आणि ती लाजली. त्याचं कारणही खास होतं. तुला मनाच्या आतून ओळखणारा व्यक्ती कोण ? असा सवाल मिलिंदने मलायकाला केला होता. यावर मलायकाने अर्जुन कपूरचं नाव घेतलं. त्यावर ती पुढे म्हणाली की, तो मला ओळखतो, समजून घेतो आणि कधी कधी त्रासही देतो. यानंतर मलायका नुकताच आलेला अर्जुनचा मेसेज वाचताना लाजून चूर होते. त्यात आय लव्ह यू लिहलेलं असतं. त्यामुळेच ती लाजते. वाचा : जुन्या मालिकांची गच्छंती! Zee पाठोपाठ Sony marathi आणि स्टार प्रवाहवर येणार 4 नव्या मालिका यावेळी मिलिंदने मलायकाला आणखी एक प्रश्न विचारला. तो म्हणजे मलायकाला कोण हॉट वाटतं ? यावर मलायकाने डॅनियल क्रेगचं नाव सांगितलं. तर महिला क्रश म्हणून बेला हदीद आवडत असल्याचंही ती देखी सांगितलं. अनेकवेळा मलायकाला तिच्या कपड्यावरून तर कधी तिच्या अर्जुनसोबतच्या रिलेशनशिपवरून ट्रोल केलं जातं. मात्र असे जरी असली तरी मलायकाने कधीच तिचे अर्जुनसोबतचे नाते जगापासून लपवूव ठेवलेले नाही.
    Published by:News18 Trending Desk
    First published:

    Tags: Arjun kapoor, Bollywood actress, Bollywood News, Malaika arora

    पुढील बातम्या