अर्जुन कपूर लागला कॅटरिनाच्या मागे; या फोटोवरून केलं ट्रोल

अर्जुन कपूर लागला कॅटरिनाच्या मागे; या फोटोवरून केलं ट्रोल

याआधीही अर्जुननं कतरिनाच्या मॅक्सिको व्हेकेशनच्या फोटोची खिल्ली उडवली होती.

  • Share this:

मुंबई, 17 ऑगस्ट : बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर मागच्या काही काळापासून मलायका अरोरासोबतच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत आहे. तो नेहमीच मलायकाच्या फोटोंवर कमेंट करताना दिसतो. मात्र सध्या अर्जुन आणखी एक अभिनेत्रीच्या फोटोवर अनेकदा कमेंट करताना दिसतो. ही अभिनेत्री म्हणजे दुसरी तिसरी कोणी नाही तर कतरिना कैफ आहे. मागच्या काही काळापासून अर्जुन सतत कतरिनाच्या फोटोवर कमेंट करताना दिसत आहे. नुकताच कतरिनानं तिच्या इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला ज्यावर पुन्हा एकदा अर्जुननं कमेंट करून तिला चिडवण्याचा प्रयत्न केला.

कतरिनानं तिच्या इन्स्टाग्रामवर IIFA अवार्ड्सचा फोटो शेअर केला आहे. ज्यात ती परफॉर्मन्स करताना दिसत आहे. या फोटोची खास गोष्ट अशी की, तिनं देसी वेस्टर्न लुकसोबत सनग्लासेस घातले आहेत. याच फोटोवर अर्जुननं एक मजेशीर कमेंट केली. अर्जुननं लिहिलं, याला दिवसा नाही रात्री घालयचं असतं. तु याच्यामुळे कुठे पडू नयेस असं मला वाटतं.

कतरिनानं शेअर केलेल्या या फोटोमध्ये तिनं केलेलं हे ड्रेसिंग तिच्या काला चश्मा या गाण्याच्या परफॉर्मन्ससाठी होता. त्यामुळे तिनं ब्लॅक सनग्लासेस लावले होते. या फोटोला कतरिनानं यावर्षी IIFA आपल्या घरी मुंबईमध्ये 20 वर्ष साजरी करत आहे. IIFA या स्टेजवर परफर्म करणं नेहमीच खूप उत्साही वाटतं. मी वाट पाहू शकत नाही काळा चश्मा घालण्यासाठी. @IIFA awards New York.

View this post on Instagram

💙💚💛

A post shared by Katrina Kaif (@katrinakaif) on

याआधीही अर्जुननं कतरिनाच्या मॅक्सिको व्हेकेशनच्या फोटोची खिल्ली उडवली होती. या फोटोमध्ये कतरिना ब्लू बिकिनीमध्ये दिसली होती. ती एका खांबासमोर उभी राहून पोझ देत होती. या फोटोवर अर्जुननं लिहिलं, पुढे बघून चल मुली कुठे पोझ देता देता तु त्या खांबाला धडकू नकोस. यावर कतरिनानं सुद्धा त्याला मस्करीच्या अंदाजात त्याला मी काळजी घेईन असा रिप्लाल दिला होता.

View this post on Instagram

🎂 🇲🇽 =💛

A post shared by Katrina Kaif (@katrinakaif) on

याशिवाय अर्जुननं कतरिनाच्या आणखी एका फोटोवर कमेंट केली. हा फोटो कतरिनानं तिचया बर्थडे दिवशी शेअर केला होता ज्यावर अर्जुननं तिला म्हटलं, माझ्या मते तू मेक्सिकोला फोटोशूटसाठी गेली होतीस. पण कतरिनानं हा फोटो तिच्या वाढदिवसाला शेअर केल्यानं त्यानं पुढे लिहिलं, ओके आज तुझा वाढदिवस आहे. त्यामुळे मी तुझ्याशी थोडं चांगलं वागतो. तुझा दिवस चांगला जावो. तुझ्या वेड्या सवयींसाठी मी तुझ्यावर प्रेम करतो. या दोघांमधील हे संवाद पाहता त्यांच्यातील मजेदार मैत्री लक्षात येते.

===================================================================

SPECIAL REPORT: अक्षयकुमारच्या 'मिशन मंगल'वर का लागला 'अँटी हिंदू'चा ठपका?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 17, 2019 03:19 PM IST

ताज्या बातम्या