मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

आलिया-रणबीरनंतर अर्जुन-मलायका बांधणार लग्नगाठ? अभिनेत्याने केला मोठा खुलासा

आलिया-रणबीरनंतर अर्जुन-मलायका बांधणार लग्नगाठ? अभिनेत्याने केला मोठा खुलासा

बॉलिवूडमध्ये   (Bollywood Wedding)  सध्या लग्नाचं वारं वाहात आहे. विकी कौशल-कतरिना कैफपासून ते रणबीर कपूर-आलिया   (Ranbir Kapoor-Alia Bhatt)  भट्टपर्यंत अनेक सेलिब्रिटी जोडप्यांनी आता लग्नगाठ बांधली आहे. पण, या यादीत पुढे कोणते सेलिब्रिटी आहेत हे जाणून घ्यायची अनेकांना उत्सुकता लागली आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  Aiman Desai

मुंबई, 16 एप्रिल-   बॉलिवूडमध्ये   (Bollywood Wedding)  सध्या लग्नाचं वारं वाहात आहे. विकी कौशल-कतरिना कैफपासून ते रणबीर कपूर-आलिया   (Ranbir Kapoor-Alia Bhatt)  भट्टपर्यंत अनेक सेलिब्रिटी जोडप्यांनी आता लग्नगाठ बांधली आहे. पण, या यादीत पुढे कोणते सेलिब्रिटी आहेत हे जाणून घ्यायची अनेकांना उत्सुकता लागली आहे. डाएट सब्या नावाच्या व्हिडिओ एडिटरलासुद्धा हीच उत्सुकता लागली होती. आणि म्हणून त्याने अर्जुन कपूरला  (Arjun Kapoor)  विचारायचं ठरवलं की तो गर्लफ्रेंड मलायका अरोराशी   (Malaika Arora)  लग्न करण्याचा विचार करत आहे का? यावर आता अर्जुननेही उत्तर दिले आहे.

सध्या या पोस्टची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे. डाएट सब्याने अर्जुन कपूरला 'लग्न कधी ?' असा टेक्स्ट मेसेज पाठवला तेव्हा अर्जुनने अतिशय उत्साहित होत उत्तरं दिलं आहे. डाएट सब्याने आपल्या इन्स्टा स्टोरीवर अर्जुनच्या उत्तराचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे. यावर विश्वास ठेवला तर सब्याचा प्रश्न खूपच कठीण असल्याचे सांगून त्याने लग्न करण्याबाबत खुलासा केला आहे.पाहूया अर्जुनने नेमकं काय उत्तर दिलं आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या स्क्रिनशॉटमध्ये लिहिलंय की, "अर्जुन कपूर कधीच लग्न करणार नाही असे दिसते. आम्ही तुमच्यावर प्रेम करतो इट्स कूल." त्यात एक हसणारा इमोजीही शेअर करण्यात आला आहे. यानंतर डाएट सब्याने अर्जुनला प्रश्न केला- 'लग्न कधी करणार?' अर्जुन कपूरने उत्तर देत लिहिलंय, "फारच कठीण प्रश्न." पुढे त्याने लिहिलंय, "तुझी ओळख उघड केल्यावर मी लग्न करेन..."

अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. ते सतत चाहत्यांशी संवाद साधत असतात. अनेकवेळा त्यांना त्यांच्या लग्नाबाबत विचारलं जातं. या दोघांच्या चाहत्यांना त्यांच्या लग्नाची प्रचंड उत्सुकता आहे.अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा गेल्या काही वर्षां पासून एकमेकांना डेट करत आहेत. त्यांनी 2019 मध्ये त्यांचे नाते अधिकृत केले होते आणि तेव्हापासून ते सोशल मीडियावर एकमेकांसोबत रोमँटिक फोटो शेअर करत असतात.

First published:

Tags: Arjun kapoor, Bollywood News, Entertainment, Malaika arora