VIDEO मलायकावरच्या प्रेम अर्जुननं असं केलं जाहीर? टॅटूचा फोटो VIRAL

VIDEO मलायकावरच्या प्रेम अर्जुननं असं केलं जाहीर? टॅटूचा फोटो VIRAL

आपल्या नव्या टॅटूचा फोटो अर्जुननेच सोशल मीडियावर शेअर केलाय. टॅटू काढतानाचा व्हिडिओसुद्धा त्यानं शेअर केला आहे.

  • Share this:

मुंबई, 29 जुलै : बॉलिवूडमध्ये सध्या सर्वांत जास्त चर्चा असलेलं अफेअर आहे मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांचं. गेले काही दिवस मलायका आणि अर्जुन यांचं काहीतरी सुरू असल्याची चर्चा होती. नंतर दोघांनीही केलेल्या सोशल मीडिया पोस्टवरून या नात्यावर शिक्कामोर्तब झालं. गेले काही दिवस तर हे नातं लग्नापर्यंत जाणार अशी चर्चा आहे. सलमानचा भाऊ अरबाज खानबरोबर जवळपास 18 वर्षं संसार केल्यानंतर मलायकानं घटस्फोट घेतला आणि त्यानंतर ती अर्जुनच्या जवळ आली. काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका जाहीर मुलाखतीत मलायकानं अर्जुनशी असलेल्या नात्याची कबुलीही दिली होती.

अर्जुन कपूरनेही आता मलायकाशी असलेलं नातं अनोख्या पद्धतीने जाहीर केलंय. आपल्या नव्या टॅटूचा फोटो अर्जुननेच सोशल मीडियावर शेअर केलाय.

हे पाहा - मुहूर्त ठरला? मलायकाच्या आई-बाबांना भेटायला मध्यरात्री घरी पोहोचला अर्जुन कपूर

टॅटू काढतानाचा व्हिडिओसुद्धा त्यानं शेअर केला आहे. Per Ardua Ad Astra असं वाक्य अर्जुनने दंडावर कोरून घेतलंय. याचा अर्थही त्यानं पोस्टमध्ये लिहिला आहे.

 

View this post on Instagram

 

Yes that’s my second tattoo and it means : From adversity to the stars. I’d been wanting to get another tattoo for a long time.. This one took a while to figure because honestly it had to mean something very special.. And after a lot of back & forth and thinking and over thinking, I finally got this done! Courtesy - @saviodsilvasfineartstudio

A post shared by Arjun Kapoor (@arjunkapoor) on

संकटांतून ताऱ्यांपर्यंत... असा या लॅटिन शब्दाचा अर्थ आहे. रॉयल न्यूझिलंड एअरफोर्सचं हे घोषवाक्य आहे. आणि 1947 पर्यंत रॉयल इंडियन एअर फोर्सचंही हे घोषवाक्य होतं.

अभिनेत्रींसाठी लग्नाचं योग्य वय काय? 'हे' वाचून तुमचे सर्व भ्रम होतील दूर

अर्जुननं या पोस्टमध्ये असंही लिहिलंय की 'मला दुसरं टॅटू करून घ्यायचंच होतं. पण त्यासाठी योग्य डिझाईनच्या शोधात होतो. मला अर्थपूर्ण असं काही हवं होतं. हे करायचं ठरलं तेव्हाही माझ्या आयुष्याशी निगडित अर्थ त्यात होता. थोडा पुढे मागे विचार करून मी हेच काढून घ्यायचा निर्णय घेतला.'

अर्जुनचं हे टॅटू मलायकला आवडलं आहे. अनुष्का शर्मानेही इन्स्टाग्रामवर कमेंट करत वा  वा क्या बात है असं म्हटलंय. या टॅटूशी मलायकाचा थेट संबंध दिसत नसला, तरी सध्या अर्जुनच्या आयुष्यात असलेलं तिचं स्थान पाहता तो कुणाकडे या अर्थपूर्ण टॅटूचा निर्देश करत आहे हे स्पष्ट आहे. अर्जुन नुकताच मलायकाच्या आई-वडिलांनाही भेटायला गेल्याचं वृत्त आहे.

----------------------------------------------------------

man vs wild: पंतप्रधान मोदींचा अ‍ॅडव्हेंचरस अंदाज; पहिला टीझर रिलीज, पाहा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 29, 2019 08:02 PM IST

ताज्या बातम्या