मलायका नाही तर ही व्यक्ती अर्जुन कपूरच्या आयुष्यातील 'हुकूमी एक्का'; तिच्यासाठी हातावर गोंदवला टॅटू

अर्जुन कपूरच्या आयुष्यात ही व्यक्ती खूप खास आहे.

अर्जुन कपूरच्या आयुष्यात ही व्यक्ती खूप खास आहे.

  • Share this:
मुंबई, 22 जून : मलायका अरोरा (Malaika Arora) सोबतच्या नात्यामुळे बॉलिवूड (Bollywood) अभिनेता अर्जुन कपूर (Arjun Kapoor) नेहमी चर्चेत असतो. त्याने नुकतंच आपल्या हातावर एक टॅटू काढला आहे. हा टॅटू A नावाचा आहे. A हे अर्जुनच्या नावाचं पहिलं अक्षर असलं तरी अर्जुनने हा टॅटू एका खास व्यक्तीसाठी काढला आहे. अर्जुन कपूरनं आपल्या डाव्या हाताच्या मनगटावर हा टॅटू काढला आहे. ‘ए’ हे इंग्रजी अक्षर आणि त्याखाली पत्त्यातील हुकुमाचा एक्का मानल्या जाणाऱ्या इस्पिक एक्क्याचे (Spade Ace) चिन्ह आहे. हा टॅटू दर्शवणारा एक व्हिडिओ त्यानं नुकताच आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
View this post on Instagram

A post shared by Arjun Kapoor (@arjunkapoor)

अर्जुन कपूरने हा टॅटू आपल्या बहिणीसाठी काढला आहे. बहिणीसाठी एक खास संदेशही दिला आहे. त्याच्या आयुष्यात त्याची बहिण अंशुलाचं स्थान किती महत्त्वाचं आहे याची कल्पना यावरून येते. त्यानं या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, ‘ती माझ्यासाठी खूपच सामर्थ्यवान आहे. अंशुला आणि मी आयुष्यात आणि ‘ए’ या अक्षराद्वारे नावातही जोडले गेलो आहोत.’ या कॅप्शनमध्ये त्यानं इस्पिक एक्क्याचे चिन्ह (Spade Ace) आणि ब्लॅक हार्ट (Black Heart) इमोजीही (Emoji) टाकली आहे. अर्जुनच्या या पोस्टवर अंशुलानं ‘लव्ह यू’ (Love You) अशी कमेंट केली आहे. तिनं हार्ट आणि इन्फिनिटी इमोजी टाकत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. हे वाचा - रशियाच्या रस्त्यांवर साडी नेसून फिरतेय तापसी; पाहा तर स्वॅग अर्जुन कपूर याचं आपली बहिण अंशुला (Anshula) हिच्याशीदेखील अगदी घट्ट नातं आहे. या दोघा बहिण भावाच्या प्रेमाची, त्यांच्यातील घट्ट नात्यचं नेहमीच उदाहरण दिलं जातं. दिग्दर्शक बोनी कपूर आणि त्यांची पहिली पत्नी मोना कपूर यांची ही अर्जुन आणि अंशुला ही दोन मुलं आहेत. लहानपणी आई-वडील विभक्त झाल्यानं खचलेल्या अर्जुनला अंशुलानंच खंबीरपणे सांभाळलं आहे. लहान बहिण असूनही अंशुला नेहमीच अर्जुन कपूरच्या पाठीशी ठामपणे उभी राहिली आहे. त्यामुळं त्याचं नातं अगदी खास आहे. आपल्याला सांभाळणाऱ्या, आपल्या पाठीशी नेहमी उभ्या राहणाऱ्या लाडक्या बहिणीवर अर्जुनचं निरातिशय प्रेम आहे. म्हणूनच त्यानं आपल्या हातावर तिच्या नावाचा टॅटू (Tattoo) काढून घेतला आहे. हे वाचा - एकमेकांचं तोंडही पाहात नाहीत, 'या' प्रसिद्ध रोमँटिक जोड्या, पाहा PHOTO या दोघा बहिण भावांमधील प्रेमळ आणि घट्ट नात्यानं अनेकांना भावूक केलं आहे. अभिनेता आयुष्मान खुराना (Ayushman Khurana) याच्यासह अनेक चाहत्यांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. अर्जुन कपूरच्या चाहत्यांनी त्याच्या बहिणीवरच्या गाढ प्रेमाबद्दल त्याचं कौतुक केलं आहे. हे खूपच गोड आणि अद्भुत आहे, अशी प्रतिक्रिया एका चाहत्यानं व्यक्त केली आहे, तर एकानं त्या दोघांना खूप प्रेम असं म्हटलं आहे. अभिनेता आयुष्मान खुराना यानं या पोस्टवर हार्ट इमोजी टाकून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत, तर हेअरस्टायलिस्ट अलिम हकीम यानं ‘वाह’ अशी कमेंट केली आहे.
Published by:Priya Lad
First published: