अर्जुननं कन्फर्म केलं मलायका सोबतचं नातं, असा आहे लग्नाचा प्लान

मलायकासोबतच्या नात्यावर अर्जुननं आता नवा खुलासा केला आहे.

News18 Lokmat | Updated On: Jul 6, 2019 06:50 PM IST

अर्जुननं कन्फर्म केलं मलायका सोबतचं नातं, असा आहे लग्नाचा प्लान

मुंबई, 6 जुलै : अभिनेता अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा यांच्या रिलेशनशिपची चर्चा सोशल मीडियावर जोरदार सुरू आहे. अर्जुनच्या वाढदिवसाला मलायकानं सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट करत प्रेमाची कबुलीही दिली. त्यानंतर एका मुलाखतीत मलायका अर्जुनबाबत मोकळेपणानं बोलली. याशिवाय अर्जुनही त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये मलायकाचा एक फोटो शेअर केला होता. ज्यात त्यानं माझं हृदय हिच्याकडे आहे असं म्हटलं होतं. त्यानंतर मलायकासोबतच्या नात्यावर अर्जुननं आता नवा खुलासा केला आहे.

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अर्जुननं म्हणाला, मी आणि मलायका या नात्यात खूप एंजॉय करत आहोत. मात्र लग्नाबाबत सध्या तरी आमचा कोणताही प्लान नाही. सध्या आम्ही आमच्या नात्याला वेळ देत आहोत. आम्हाला एकमेकांबद्दल आणखी अनेक गोष्टी समजून घ्यायच्या आहेत. त्यामुळे सध्या तरी आम्ही लग्नाचा ताण घेऊ इच्छित नाही. याआधी एका मुलाखतीत मलायकानं घटस्फोटानंतर नवं नातं माझ्यासाठी सोपं नव्हतं. मला खूप असुरक्षित वाटत होतं. पण मला एक नातं हवं होतं आणि ते मला मिळालं. मी या नात्यात खूप खुश आहे असं म्हटलं होतं.

हृतिक आणि तापसीनंतर आता दीपिका पदुकोण रंगोली चंडेलच्या निशाण्यावर

Loading...

 

View this post on Instagram

 

Happy bday my crazy,insanely funny n amazing @arjunkapoor ... love n happiness always

A post shared by Malaika Arora (@malaikaaroraofficial) on

याशिवाय मलायका, ‘अर्जुनसोबतच्या नात्यानं आई म्हणून मी आणि अरहानच्या नात्यात काहीच बदल झाला नाही. दोन व्यक्तीमधील नातं किंवा वेगळं होण्याचा निर्णय हा त्यांच्या खासगी आयुष्याचा भाग असतो. त्यामुळे त्यावरुन त्यांच्याबद्दल कोणतंही मत मांडणं चुकीचं आहे. माझा मुलगा नेहमीच माझी पहिली गरज आहे. तो मला खूप समजून घेतो आणि पाठिंबा देतो. मला याची खूप गरज होती. त्याच्यासाठी माझा आनंद आणि माझ्यासाठी त्याचा आनंद नेहमीच सर्वात जास्त महत्त्वाचा असतो. मला घडविण्यात अरहानची महत्त्वपूर्ण भूमिका आहे.’ असं सांगितलं होतं.

रणवीर सिंगच्या पहिल्या ऑडिशनचा हा व्हिडिओ तुम्ही पाहिलात का?

=====================================================================

SPECIAL REPORT: सोशल मीडियावर व्हायरल होणारं बॉटल कॅप चॅलेज काय आहे?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 6, 2019 06:50 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...