Home /News /entertainment /

अर्जुनच्या या सवयीला वैतागली आहे मलायका अरोरा, अभिनेत्यानं स्वतःच केला खुलासा

अर्जुनच्या या सवयीला वैतागली आहे मलायका अरोरा, अभिनेत्यानं स्वतःच केला खुलासा

अर्जुननं त्याच्या एका अशा सवयीचा खुलासा केला आहे ज्यामुळे मलायका वैतागली असून ती सवय कशी सुटेल याचा ती नेहमी विचार करत असते.

  मुंबई, 18 एप्रिल : कोरोना व्हायरसमुळे सध्या संपूर्ण जगच थांबलं आहे. भारतातही सर्व ठिकाणी लॉकडाऊन करण्यात आलं आहे. त्यामुळे नेहमीच बीझी राहणाऱ्या सर्व बॉलिवूड सेलिब्रेटींकडे सध्या वेळच वेळ आहे. सध्या सर्वजण त्यांच्या सोशल मीडियावर बरेच सक्रिय असलेले पाहायला मिळत आहेत. यापैकीच एक आहे अभिनेता अर्जुन कपूर. मागच्या काही दिवसांपासून अर्जुन सोशल मीडियावर सतत काही ना काही शेअर करताना दिसत आहे. अशात त्यानं त्याची गर्लफ्रेंड मलायका अरोरा बद्दल नवा खुलासा केला आहे. इन्स्टाग्रामवरील एका पोस्टमध्ये अर्जुननं त्याच्या एका अशा सवयीचा खुलासा केला आहे ज्यामुळे मलायका वैतागली असून ती सवय कशी सुटेल याचा ती नेहमी विचार करत असते. अर्जुनची एक अशी सवय आहे जी मलायकाला अजिबात आवडत नाही.
  View this post on Instagram

  #arjunkapoor #malaikaarora

  A post shared by Wonder Woman (@qwerty_47647) on

  इन्स्टाग्रामवरील एक गेम टू डूच्या दरम्यान अर्जुव कपूरला एका युजरनं 'फोनचा वापर कमी कर' असं लिहिलं होतं. या पोस्टला आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर पोस्ट करत अर्जुननं लिहिलं, ही अशी सवय आहे जी आणखी एका व्यक्तीला वाटतं की मी सोडून द्यावी. ही व्यक्ती तुझ्याशी नक्की सहमत असेल. या पोस्टमध्ये अर्जुननं मलायकाला टॅग केलं आहे. या अगोदर बॉलिवूड हंगामाशी झालेल्या लाइव्ह चॅट सेशनमध्ये अर्जुननं त्याच्या लव्ह लाइफबद्दल अनेक खुलासे केले होते. या लाइव्ह चॅटमध्ये एका चाहत्यानं विचारलं, गर्लफ्रेंड मलायकाशी लग्नाबाबत तुझा काय प्लान आहे. यावर अर्जुननं धम्माल उत्तर दिलं. तो म्हणाला, 'जेव्हा मी लग्न करेन तेव्हा तुम्हाला सर्वांना नक्की सांगेन. सध्या तरी काही प्लान नाही आहे आणि समजा असेलच तरीही आता कसं लग्न करणार? सध्या तरी लग्नाचा कोणताही प्लान नाही. पण जेव्हा लग्न करायचं असेल तर कोणापासून काहीही लपवणार नाही.'
  Published by:Megha Jethe
  First published:

  Tags: Arjun kapoor, Bollywood, Malaika arora

  पुढील बातम्या