फक्त 300 रुपयांत भेटा आवडत्या सेलिब्रिटीला! कपूर घराण्यातल्या 'या' सदस्याकडून भन्नाट ऑफर

फक्त 300 रुपयांत भेटा आवडत्या सेलिब्रिटीला! कपूर घराण्यातल्या 'या' सदस्याकडून भन्नाट ऑफर

यासाठी तुम्हाला काही सोप्या स्टेप फॉलो कराव्या लागणार आहेत. जाणून घ्या नक्की काय आहे ही ऑफर...

  • Share this:

मुंबई, 2 ऑगस्ट : प्रत्येकाला इच्छा असते की आपण आपल्या आवडत्या बॉलिवूड सेलिब्रेटीला भेटावं. पण नेहमीच हे शक्य होतच असं नाही. पण आता तुम्हाला ही संधी उपलब्ध होणार आहे. बॉलिवूड स्टार अर्जुन कपूरची बहीण अंशुला कपूर ही संधी तुमच्यासाठी उपलब्ध करून देणार आहे. सोशल मीडियावर सक्रिय असणारी अंशुला केवळ 300 रुपयांत तुमच्या आवडत्या सेलिब्रेशी तुमची भेट घडवून आणणार आहे. मात्र यासाठी तुम्हाला काही सोप्या स्टेप फॉलो कराव्या लागणार आहेत.

अंशुला कपूर नेहमीच तिच्या सोशल मीडियावर बहीणी जान्हवी आणि खूशी यांच्यासोबत फोटो शेअर करत असते. अनेकदा ती ट्रोलर्सनाही सडेतोड उत्तरं देताना दिसते. मात्र नुकतीच तिनं ‘फनकाइंड’ नावाची एक वेबसाइट लाँच केली आहे. ज्याद्वारे ती 300 रुपये घेऊन सेलिब्रेटी आणि चाहत्याची भेट घडवून आणण्याचा दावा करत आहे. त्यामुळे आपल्या आवडत्या बॉलिवूड कलाकाराला भेटण्याची तुमची इच्छा या वेबसाइटमुळे पूर्ण होऊ शकते.

TMC खासदार नुसरत जहांचे हनिमूनचे PHOTO VIRAL

 

View this post on Instagram

 

Fierce Christmas 🙌🏽💥 #SistersBeforeMisters #FierceAndBright✨ #TheseAreSomeOfMyFavouritePeeps

A post shared by Anshula Kapoor (@anshulakapoor) on

अंशुलानं लाँच केलेल्या या ‘फनकाइंड’ वेबसाईटवर चाहत्यांना त्याच्या आवडत्या बॉलिवूड सेलिब्रेटीच्या डिटेल्ससह 300 रुपये जमा करावे लागणार आहेत. त्यानंतर अंशुला आणि टीम एका लकी ड्रॉद्वारे एका चाहत्याची निवड करतील आणि त्यानंतर ती व्यक्ती(चाहता/ चाहती) आपल्या आवडत्या सेलिब्रेटीसोबत एक संपूर्ण दिवस घालवू शकते.

दिया मिर्झाच नाही तर 'या' बॉलिवूड कलाकारांचेही घटस्फोट ठरले होते धक्कादायक!

अंशुलाच्या टीमनं असा दावा केला आहे की, चाहत्यांकडून मिळालेल्या या पैशाचा वापर चांगल्या कामासाठी करण्यात येणार आहे. या प्रोजेक्टमधून मिळालेले पैसे एखाद्या चॅरिटीला दिले जाणार आहेत. मात्र चाहत्यांकडून मिळालेलं हे डोनेशन कोणत्या संस्थेला दिलं जाणार आहे याबाबत मात्र कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही.

आणखी एका अभिनेत्रीने शेअर केला Nude Yoga चा पुरस्कार, शेअर केले Topless Photo

सेलिब्रेटींच्या या यादीत सोनाक्षी सिन्हा, जान्हवी कपूर, आलिया भट, अर्जुन कपूर यांच्यासोबतच बॉलिवूडमधील अनेक प्रसिद्ध कलाकारांचा समावेश करण्यात आला आहे. इतकंच नाही तर यामध्ये फक्त बॉलिवूडमधीलच नव्हे तर क्रिडा आणि बिझनेसशी संबंधीत सेलिब्रेटींचाही समावेश आहे.

===========================================================

VIDEO: मुंबईत हवामान विभागाकडून हाय अलर्ट, 'या' दिवशी मुसळ'धार'

Published by: Megha Jethe
First published: August 2, 2019, 1:41 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading