मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

अर्जुन कपूरने शेअर केला बीटीएस Video; मलायकाने कमेंट करत केली दिल की बात...

अर्जुन कपूरने शेअर केला बीटीएस Video; मलायकाने कमेंट करत केली दिल की बात...

अभिनेता अर्जुन कपूरने त्याच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर एक व्हिडिओ शेअर केला. ज्यामध्ये तो वेगवेगळ्या पोजमध्ये फोटोशूट करताना दिसत आहे. यावर मलायकाने कमेंट करत सर्वांचे लक्ष वेधले आहे.

  • Published by:  News18 Trending Desk

मुंबई, 19 डिसेंबर- बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर (Arjun kapoor) आणि मलायका अरोरा (Malaika arora) त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमुळे सोशल मीडियावर खूप चर्चेत असतात. दोघेही अनेकदा एकमेकांच्या पोस्टवर कमेंट करून आपली प्रतिक्रिया व्यक्त करतात. रविवारी अभिनेता अर्जुन कपूरने त्याच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर एक व्हिडिओ शेअर केला. ज्यामध्ये तो वेगवेगळ्या पोजमध्ये फोटोशूट करताना दिसत आहे.

हा व्हिडिओ अभिनेत्याने त्याच्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. ज्यामध्ये तो आरशाच्या मागे पोज देताना दिसत आहे. अभिनेत्याचा हा व्हिडिओ एका जाहिरातीच्या शूटिंगदरम्यानचा असल्याचे सांगण्यात येत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत त्याने कॅप्शन लिहिलं आहे की, द बिहाइंड द सीन ऑफ मी बॅग द हुडी.

वाचा-हृतिक रोशनच्या एक्स वाईफने सेलिब्रेट केला रुमर्ड बॉयफ्रेंडचा बर्थडे; फोटो VIRAL

अशी होती मलायकाची प्रतिक्रिया

अभिनेत्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच पसंत केला जात आहे. या व्हिडिओला आतापर्यंत हजारो लोकांनी लाईक केले आहे. हाच व्हिडिओ पाहून अर्जुनची गर्लफ्रेंड मलायका अरोरा हिने कमेंट करत प्रतिक्रिया दिली आहे. मलायकाने फायर अँड हार्टच्या इमोजीसह व्हिडिओवर कमेंट केली आहे.

View this post on Instagram

A post shared by Arjun Kapoor (@arjunkapoor)

अर्जुन आणि मलायका मालदीवमध्ये सुट्टयांचा आनंद घेतल्यानंतर नुकतेच मायदेशी परतले आहेत. दोघांनी त्यांच्या व्हेकेशनचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ज्यामध्ये ते एकमेकांसोबत चांगला वेळ घालवताना दिसत आहेत.

वाचा-Video- सलमान खानला घाबरली सनी लिओनी; म्हणाली, 'थप्पड मत मारो..'

अर्जुनचे आगामी चित्रपट

अर्जुनच्या वर्क फ्रंटबद्दल सांगायचे झाले तर, तो लवकरच एकता कपूरच्या 'एक व्हिलन रिटर्न्स' या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेता जॉन अब्राहम, दिशा पटानी आणि तारा सुतारिया महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट 2014 मध्ये आलेल्या सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि श्रद्धा कपूर अभिनीत एक व्हिलन या चित्रपटाचा सिक्वेल आहे. याशिवाय अर्जुन 'द लेडी किलर' आणि विशाल भरतद्वाजच्या चित्रपटात दिसणार आहे.

First published:

Tags: Arjun kapoor, Bollywood News, Entertainment, Malaika arora