'दो दिल मिल रहे है...' अर्जुन कपूरचा 'तो' फोटो होतोय व्हायरल

अर्जुननं त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक असा फोटो शेअर केला जो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

News18 Lokmat | Updated On: Sep 2, 2019 04:03 PM IST

'दो दिल मिल रहे है...' अर्जुन कपूरचा 'तो' फोटो होतोय व्हायरल

मुंबई, 2 सप्टेंबर : बॉलिवूडमधील सर्वाधिक चर्चेत असणारी जोडी म्हणजे अभिनेता अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा. अनेक वेळा एकत्र स्पॉट करण्यात आलेल्या या जोडीने काही दिवसांपूर्वीच त्यांच्या नात्याची कबुली दिली आहे. त्यामुळे आता हे दोघं बऱ्याच वेळा एकत्र फिरताना दिसतात. सध्या मलायका आणि अर्जुन व्हेकेशनवर असून अर्जुन सोशल मीडियाच्या माध्यमातून ते त्या ठीकाणचे फोटो शेअर करत आहे. त्यातच अर्जुननं त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक असा फोटो शेअर केला जो मलायकाप्रती त्याचं प्रेम व्यक्त करतो.

अर्जुनने हार्ट शेपमधील दोन फुग्यांचा फोटो इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत त्याने ‘दो दिल मिल रहे हैं मगर…’ असं कॅप्शन दिलं आहे. हे गाणं लोकप्रिय चित्रपट ‘परदेस’ या चित्रपटामधील असून अभिनेता शाहरुख खान आणि महिमा चौधरीवर चित्रीत करण्यात आलं आहे. तर कुमार सानू यांचा स्वरसाज या गाण्याला चढला आहे.

'बिग बॉस मराठी 2'च्या बक्षिसाच्या रक्कमेचं काय करणार? शिवनं दिलं हे उत्तर

या फोटोमुळे आता सोशल मीडियावर सगळीकडे मलायका-अर्जुनची चर्चा सुरू झाली आहे. तसं अशाप्रकारे मलायकावर प्रेम व्यक्त करायची अर्जुनची पहिली वेळ नाही. याआधीही त्यानं अनेकदा मलायकाच्या सोशल मीडिया पोस्टवर कमेंट करत असतो. याशिवाय तिच्यासाठी तो अनेकदा तिच्यासाठी सोशल मीडियावर पोस्ट करत असतो.

Loading...

पती निक जोनससोबत प्रियांका पोहोचली हॉस्पिटलमध्ये, हे आहे कारण

 

View this post on Instagram

 

When she caught me smiling...

A post shared by Arjun Kapoor (@arjunkapoor) on

दरम्यान, गेल्या काही दिवसापासून या दोघांच्या लग्नाच्या चर्चां सुरू होत्या. मात्र या दोघांनी या वृत्ताला नकार दिला. सध्या तरी आम्ही लग्नाचा विचार करत नसून फक्त एकमेकांना जास्तीत जास्त जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत असं एका मुलाखतीत. अर्जुन म्हणाला होता. पण हे दोघं लवकरच लग्न करणार असल्याची माहिती त्यांच्या एका जवळच्या व्यक्तीने दिली आहे. त्यामुळे यांच्या चाहत्यांचे लक्ष आता त्यांच्या लग्नाकडे लागले आहेत. सध्या अर्जुन त्याच्या आगामी ‘पानिपत’ या चित्रपटामध्ये व्यस्त असून हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सलमान-रानूच्या भेटीनंतर हा VIDEO आला समोर

==============================================================

VIDEO: डान्सचा जलवा चाहत्यांच्या शिट्ट्या; हिला म्हणतात पाकची सपना चौधरी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 2, 2019 04:03 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...