दीपिका पादुकोणची 'सवत'! अर्जुन कपूर म्हणाला, रणवीर आणि तिच्या लग्नानंतर...

दीपिका पादुकोणची 'सवत'! अर्जुन कपूर म्हणाला, रणवीर आणि तिच्या लग्नानंतर...

रणवीर सिंगबद्दल अभिनेता अर्जुन कपूरने एका मुलाखतीत दीपिकाच्या सवतीबद्दलचा खुलासा केला आहे.

  • Share this:

मुंबई, 29 नोव्हेंबर : बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंग आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण सर्वांच्या लोकप्रिय जोडप्यांपैकी एक आहेत. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये ते विवाहबंधनात अडकले होते. दोघेही त्यांच्या कामाशिवाय कपड्यांच्या स्टाइलवरून चर्चेत असतात. आता रणवीर सिंगबद्दल अभिनेता अर्जुन कपूरने एका मुलाखतीत दीपिकाच्या सवतीबद्दलचा खुलासा केला आहे.

अर्जुन कपूरने मुलाखतीत रणवीर सिंगसोबतच्या त्याच्या मैत्रीबद्दल सांगितलं. तो म्हणाला की, रणवीर माझी गाणी ऐकल्यानंतर मोठमोठे व्हॉइस मेसेज पाठवतो. अनेकदा माझ्या गालांवर किस करतो. आमच्या मैत्रीवर कशाचाही परिणाम होत नाही. मी दीपिकालासुद्धा सांगितलं आहे की मी तुझी सवत आहे.

रणीवर आणि माझ्या मैत्रीत कधीच स्टारडम आडवं आलं नाही. इतकंच काय रणवीर-दीपिकाच्या लग्नानंतरही आम्ही पहिल्यासारखेच आहोत असंही अर्जुन कपूर म्हणाला. पानीपत चित्रपटाचा ट्रेलर येण्याआधी रणवीरसिंग त्याबद्दल खूप उत्सुक होता असंही अर्जुन कपूरने सांगितलं.

अभिनेता अर्जुन कपूरचा पानीपत 6 डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अर्जुनसोबत कृती सेननसुद्धा असणार आहे.

दुसरीकडे रणवीर सिंग भारताने जिंकलेल्या पहिल्या वर्ल्ड कपवर आधारीत 83 चित्रपटाच्या तयारीत व्यग्र आहे.

काही दिवसांपूर्वी भारताचे माजी कर्णधार कपिल देव यांच्यासारखा लूक केलेला फोटो शेअर केला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 29, 2019 01:26 PM IST

ताज्या बातम्या