Home /News /entertainment /

अर्जुन कपूरला एका वर्षात दुसऱ्यांदा कोरोनाची लागण; बहीण अंशुला, रियाचा रिपोर्टही पॉझिटिव्ह

अर्जुन कपूरला एका वर्षात दुसऱ्यांदा कोरोनाची लागण; बहीण अंशुला, रियाचा रिपोर्टही पॉझिटिव्ह

बॉलिवूडमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा शिरकाव झालेलं दिसून येत आहे. अभिनेता अर्जुन कपूरला कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे.

    arjun kaमुंबई, 29 डिसेंबर-   बॉलिवूडमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा शिरकाव झालेलं दिसून येत आहे. अभिनेता अर्जुन कपूरला कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. अर्जुनसोबत बहीण अंशुला कपूर, सोनम कपूरची बहीण रिया कपूर आणि तिचा पती करण बुलानी यांनासुद्धा कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. नुकताच रिया कपूर आणि करण करिश्मा कपूरच्या ख्रिसमस पार्टीत सहभागी झाले होते. त्यामुळे आता पुन्हा एकदा चिंता वाढली आहे. तर दुसरीकडे अर्जुन कपूरला एका वर्षात दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे. या सर्वांमध्ये मलायका अरोराचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्याचं समजलं आहे. अभिनेता अर्जुन कपूरला कोरोनाची लग्न झाल्याची माहिती नुकताच समोर आली आहे. अर्जुनसोबतच त्याची लहान बहीण अंशुला कपूरलासुद्धा कोरोना झाल्याचं स्पष्ट झालं आहे.. नुकताच अर्जुन कपूरने आपल्या बहिणीसोबतचा एक व्हिडीओ शेअर केला होता. यामध्ये दोघेही जबरदस्त डान्स मूव्ह्स करताना दिसून आले होते. अर्जुन कपूरने हा व्हिडीओ अंशुलाच्या वाढदिवसानिमित्त शेअर केला होता. या दोघांच्या या व्हिडीओची सोशल मीडियावर फारच चर्चा सुरु होती. त्यांनतर आता कोरोनाची लागण झाल्याचं वृत्त समोर आलं आहे. सोनम कपूरच्या बहीण-भावोजीलाही कोरोनाची लागण- अनिल कपूरची लहान मुलगी आणि सोनम कपूरची बहीण रिया कपूरलाही कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. इतकंच नव्हे तर तिचा पती निर्माता करण बुलानीचा कोरोना रिपोर्टसुद्धा पॉझिटिव्ह आला आहे. या सर्वांनी स्वतःला होम आयसोलेशनमध्ये ठेवलं आहे. ते कोरोना नियमांचं पालन करत असल्याचं म्हटलं जात आहे. रिया आणि करण यांनी नुकताच करिश्मा कपूरच्या ख्रिसमस पार्टीमध्ये सहभाग घेतला होता. (हे वाचा:बिग बी अमिताभ बच्चन यांना जडली भारी सवय; दररोज रात्री न विसरता करतात हे काम) बॉलिवूडमध्ये कोरोनाचा शिरकाव- नुकताच अभिनेता रणवीर शौरीच्या १० वर्षांच्या मुलाला कोरोनाची लागण झाली होती. रणवीर आपल्या मुलासोबत गोव्याला व्हेकेशनला गेला होता. दरम्यान परतताना त्याच्या मुलाला कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं होतं. तसेच काही दिवसांपूर्वी करण जोहरच्या पार्टीत सहभागी झालेल्या करिना कपूर, महिप कपूर,शनाया कपूर, अमृता अरोरा यांनासुद्धा कोरोनाची लागण झाली होती.
    Published by:Aiman Desai
    First published:

    Tags: Arjun kapoor, Entertainment

    पुढील बातम्या