अर्जुन कपूर म्हणतो, मी मलायकाशी लग्न केल तर...

अर्जुन कपूर म्हणतो, मी मलायकाशी लग्न केल तर...

अर्जुन कपूरनं नुकत्याच एका मुलाखतीत त्याच्या लग्नाचा प्लान शेअर केला.

  • Share this:

मुंबई, 08 ऑक्टोबर : अभिनेत्री मलायका अरोरा आणि अभिनेता अर्जुन कपूर यांच्या नात्याची चर्चा पुन्हा एकदा सोशल मीडियावर सुरू आहे. काही दिवसांपूर्वीच मलायकानं तिच्या ड्रीम वेडिंगच्या आयडिया शेअर केल्यानंतर हे दोघं लवकरच लग्नाच्या बेडीत अडणार असल्याचं बोललं जात आहे. दरम्यान मलायकाचा बॉयफ्रेंड अभिनेता अर्जुन कपूरनंही मलायकासोबत लग्नावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यानं नुकत्याच एका मुलाखतीत असं काही बोललं आहे की लवकरच या दोघांच्या लग्नाची बातमी मिळाली तर यात नवल असणार नाही.

अर्जुन कपूरनं नुकत्याच एका मुलाखतीत त्याच्या लग्नाचा प्लान शेअर केला. यासोबतच त्याचं लग्न गुपचूप होणार नसल्याचंही त्यानं स्पष्ट केलं. अर्जुन म्हणला, सध्या तरी आमचा लग्नाचा कोणताही विचार नाही. पण जेव्हा मी लग्न करेन तेव्हा सर्वांना बोलवेन. माझी पूर्ण फॅमिली बिग फॅट वेडिंगमध्ये विश्वास ठेवते. त्यामुळे माझं लग्न छोट्या स्वरुपात होणार नाही. त्यामुळे आता जेव्हा अर्जुनचं लग्न होईल तेव्हा त्याबद्दल सर्वांना समजेल हे नक्की.

छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याबद्दल KBC चा माफीनामा, पाहा VIDEO

 

View this post on Instagram

 

♥️

A post shared by Arjun Kapoor (@arjunkapoor) on

या आधी मलायका अरोरानं नुकतीच नेहा धुपियाचा चॅट शो ‘नो फिल्टर नेहा’मध्ये हजेरी लावली. यावेळी तिनं अर्जुन आणि तिच्या नात्याविषयी अनेक गोष्टी शेअर केल्या आहेत. पिंकव्हिलानं दिलेल्या वृत्तानुसार मलायका अर्जुन बद्दल म्हणाली, ‘अर्जुन प्रत्येक गोष्टीत परफेक्ट आहे मात्र त्याला पैसे सांभाळता येत नाहीत.’ याशिवाय मलायकानं अर्जुन आणि तिच्या लग्नाविषयी सुद्धा यावेळी चर्चा केली. तिच्या बोलण्यावरुन तरी ती लग्नासाठी प्रचंड उत्सुक असल्याचं दिसत आहे.

अबब! छोट्याशा बॅगसाठी दीपिका मोजते इतके पैसै, किंमत ऐकून व्हाल हैराण

ड्रीम वेडिंग बद्दल बोलताना मलायका म्हणाली, ‘माझं ड्रीम वेडिंग बीचवर होईल आणि हे एक व्हाइट वेडिंग असेल. लग्नात मला Elie Saab gown घालायचा आहे आणि माझी गर्ल्स गँग माझ्या ब्राइडमेट्स असतील. मला ब्राइडमेट्स ही संकल्पना खूप आवडते त्यासाठी मला व्हाइट वेडिंग करायचं आहे.’ याआधीही मलायका आणि अर्जुनला त्यांच्या लग्नाबद्दल विचारलं गेलं होतं मात्र प्रत्येकवेळी हा विषय त्यांनी टाळला होता. सध्या तरी आम्ही एकमेकांना वेळ देत असल्याचं त्यांनी म्हटलं होतं.

अर्जुनच्या वर्कफ्रंट बद्दल बोलायचं तर त्याच्या बहुचर्चित पानिपत सिनेमाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. आशुतोष गोवारिकर दिग्दर्शित सिनेमाच्या ट्रेलर खूप चांगला प्रतिसाद मिळाला मात्र अर्जुनच्या कास्टिंग बद्दल अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. पण संजय दत्त आणि कृती सेनन यांच्या अभिनयाचं मात्र सोशल मीडियावर खूप कौतुक होत आहे.

बिग बींच्या प्रकृतीबाबत धक्कादायक माहिती समोर, डॉक्टरांनी दिला 'हा' सल्ला!

=========================================================================

VIDEO : कार्तिक एकादशीनिमित्तानं विठुरायाच्या दर्शनासाठी भाविकांची मांदियाळी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 8, 2019 04:37 PM IST

ताज्या बातम्या