News18 Lokmat

मलायकाशी लग्न करण्याबाबत अर्जुन कपूरनं दिली 'ही' प्रतिक्रिया

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अर्जुननं मलायका त्याच्यासाठी खास असल्याचं मान्य केलं.

News18 Lokmat | Updated On: Apr 26, 2019 11:23 AM IST

मलायकाशी लग्न करण्याबाबत अर्जुन कपूरनं दिली 'ही' प्रतिक्रिया

मुंबई, 26 एप्रिल : बॉलिवूडमध्ये सध्या मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरच्या लग्नाची चर्चा जोरदार सुरू आहे. हे दोघंही आजकाल कधी लंच तर कधी डिनर डेटवर जाताना दिसतात. मागच्या काही दिवसांपासून मलायका आणि अर्जुन लवकरच लग्न करतील असा तर्क अनेकांकडून लावला जात होता. पण काही दिवसांपूर्वीच मलायकानं या चर्चांवर प्रतिक्रिया देत हे वृत्त फेटाळून लावल्यानंतर आता अर्जुननंही यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
 

Loading...

View this post on Instagram
 

Here’s to you Maldives... To many more Sunsets & Selfies... #paradiseisland #holidayvibes


A post shared by Arjun Kapoor (@arjunkapoor) on

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अर्जुनला येत्या जूनमध्ये तो लग्न करणार का असा प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना अर्जुन म्हणाला, 'मी एवढ्या लवकर लग्न करण्याचा विचार केलेला नाही. आता मी फक्त 33 वर्षांचा आहे आणि मी लग्न केलं तर ते सर्वांना समजणारच आहे. पण सध्यातरी मला लग्नाची कोणतीही घाई नाही आणि मला या विषयावर जास्त काही बोलायचंही नाही.' अर्जुन पुढे म्हणाला, 'जर मी लग्न करायचा विचार केला तर ही गोष्ट लोकांना काहीही झालं तरीही समजणारच आहे. त्यामुळे मला ही गोष्ट लपवण्याची काहीच गरज नाही. मला माहीत आहे लोकांनी अंदाज लावणं चुकीचं नाही पण मी नेहमीच या विषयावर बोलू शकत नाही.'

वाचा : सुष्मिता सेन बॉयफ्रेंडला म्हणते, 'मेरे साथ भाग चलो'

यावेळी अर्जुननं मलायका त्याच्यासाठी खास असल्याचंही मान्य केलं. तो म्हणाला, 'मला ही गोष्ट लपवण्याची काहीही गरज नाही. लोकांना जे पाहायचं होतं ते लोकं पाहत आहेत. पण मला माझ्या खासगी जीवनावर बोलणं आवडत नाही. माणसाच्या आयुष्यात चांगल्या व्यक्ती असणं खूप गरजेचं असतं आणि याबाबतीत मी खूप नशीबवान आहे की माझ्या आयुष्यात अशीच काही चांगली माणसं आहेत.'


पाहा : अंकिता लोखंडेने सर्वांसमोर केलं बॉयफ्रेंडला किस, व्हिडीओ व्हायरल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 26, 2019 11:23 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...