मुंबई, 10 ऑगस्ट : बॉलिवूडमध्ये सध्या एक सुपर हॉट कपल नेहमीच चर्चेत असतं. हे कपल म्हणजे मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर. मागच्या काही दिवसांपासून कधी लग्न तर कधी सोशल मीडियावरील फोटो यामुळे सतत चर्चेत असतं. सध्या या दोघांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. ज्यात एक व्यक्ती मलायकाशी फ्लर्ट करतना दिसत आहे ज्यामुळे मलायका लाजताना दिसते. मात्र यावर अर्जुनची प्रतिक्रिया मात्र पाहण्यालायक आहे.
VIDEO : रवीनासोबत रोमँटिक गाण्यावर डान्स करत होता गोविंदा आणि...
अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा यांनी नुकतीच इंडियन फिल्म फेस्टिवल 2019 यावेळी हे दोघंही एकमेकांच्या बाजूला बसलेले दिसले. हा शो टीव्ही अभिनेता करण टॅकर होस्ट करत होता. त्यानं अर्जुन-मलायकाला एकत्र बसलेले पाहिल्यावर त्यांच्याशी मस्ती करायला सुरूवात केली. मात्र काही वेळानं त्यानं मलायकाशी फ्लर्ट करायला सुरूवात केली. त्यानंतर मात्र अर्जुनचं पजेसिव्ह रूप पाहायला मिळालं.
…म्हणून 2019मध्ये रिलीज होऊनही ‘उरी’ला मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
शो होस्ट करताना करण मलायका जवळ गेला आणि तिला काही प्रश्न विचारताना दिसला. विशेष म्हणजे मलायकानं या सर्व प्रश्नांची अगदी सहज उत्तरंही दिली. त्यानंतर तो अर्जुनकडे वळला आणि त्याला म्हणला, की तू खूप लकी आहेस की, तुला मलयकाच्या बाजूला बसायला मिळत आहे. हे ऐकल्यावर अर्जुन उठून उभा राहतो आणि त्याला सांगतो मागच्या मुलींशी फ्लर्ट कर.
खलनायक हूँ मैं... SAAHO च्या सर्व व्हिलन्सचे लुक रिलीज, पाहा फोटो
अर्जुनला अशाप्रकारे पजेसिव्ह झालेला पाहिल्यावर त्याठीकाणी उतस्थित असलेले प्रेक्षक जोरात हूटिंग करताना दिसतात. हे पाहिल्यावर मलायका सुद्धा लाजते. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियवर खूप व्हायरल होत आहे. दरवर्षी होत असलेल्या इंडियन फिल्म फेस्टिवल ऑफ मेलबर्नमध्ये अनेक बॉलिवूड कलाकार हजेरी लावतात. मलायकानं या इव्हेंटमध्ये रेड कलरचा गाऊन परिधान केला होता. तर अर्जुन ब्लॅक सूटमध्ये दिसला.
=============================================================
VIDEO: IMDच्या अंदाजामुळे भीती वाढली, पुढचे 4 दिवस राज्यात आणखी मुसळधार पाऊस