मलायकाशी लग्न करण्यावर अर्जुनचा नवा खुलासा, म्हणाला करेन तर...

मलायकाशी लग्न करण्यावर अर्जुनचा नवा खुलासा, म्हणाला करेन तर...

काही दिवसांपूर्वी अर्जुन-मलायका 18 एप्रिलला लग्न करतील अशा चर्चा होत्या मात्र नतंर त्या फक्त अफवा असल्याचा स्पष्ट झालं.

  • Share this:

मुंबई, 19 मे : अर्जुन कपूर  आणि मलायका अरोरा सध्या बॉलिवूडमधील सर्वाधिक चर्चेत असणारं कपल आहे. अद्याप या दोघांनीही आपल्या नात्याची कोणत्याही प्रकारची जाहीर कबूली दिली नाही. मात्र अनेक ते एकत्र स्पॉट झाल्यावर त्यांच्या लग्नाच्या चर्चांना वेग येतो. काही दिवसांपूर्वी अर्जुन-मलायका 18 एप्रिलला लग्न करतील अशा चर्चा होत्या मात्र नतंर त्या फक्त अफवा असल्याचा स्पष्ट झालं. अफवा आल्या आणि गेल्या पण अर्जुन जेव्हाही प्रसार माध्यमांसमोर येतो तेव्हा मात्र त्याला नेहमीच या नात्याविषयी वेगवेगळे प्रश्न विचारले जातात.

काही दिवासांपूर्वीच एका इव्हेंटमध्ये अर्जुनला त्याच्या लग्नाविषयी प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना अर्जुन म्हणाला, 'माझं जीवन बालपणापासून  एका रोलर कोस्टरप्रमाणे राहिलं आहे. मी काधीच जास्त लांब उडी मारत नाही किंवा मारू इच्छितही नाही. मी एका वेळी एकच पाउल पुढे टाकतो. तुमच्या सर्वांचे आशीर्वाद आणि काळजीसाठी धन्यवाद. मी जेव्हाही लग्न करेन, जर करेन तर सर्वांना नक्की सांगेन. कारण ह लपवून ठेवण्यासारखी गोष्ट अजिबात नाही.'

अर्जुन पुढे म्हणाला, 'सध्या तरी माझा लग्नाचा कोणताही प्लान नाही. मी माझ्या आयुष्यात खूश आहे. ज्या प्रकारे मीडिया आणि माझे चाहते माझ्या खासगी आयुष्याचा सन्मान करत आहेत त्यासाठी मी सर्वांचा आभारी आहे. मला खूप सन्मान मिळत आहे. पण मला वाटतं कोणतीही गोष्ट त्याच्या योग्य वेळीच व्हायला हवी.' अर्जुन सांगतो, मी आज ज्या प्रोफेशनमध्ये आहे. त्यात अशाप्रकारच्या गोष्टी होत राहतात. एक अभिनेता म्हणून मला या गोष्टींना सामोरं जावं लागणारच. ही गोष्टही नाकारता येत नाही की, जर माझ्या सोबतच्या माझ्या मित्रांची लग्न होत आहेत मग माझं का नाही. असा प्रश्न सर्वांना पडणं स्वाभाविक आहे.

अर्जुनचा 'इंडियाज मोस्ट वॉन्टेड' सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमाचा ट्रेलर काही दिवासांपूर्वीच रिलीज झाला असून त्याला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळला आहे. सत्य घटनेवर आधारीत हा सिनेमा २४ मे रोजी प्रदर्शित होणार आहे. राजकुमार गुप्ता दिग्दर्शित या सिनेमाची निर्मिती फॉक्स स्टार स्टूडिओ, राजकुमार गुप्ता, मायरा करणने केली आहे.

मुंबईतील 'हा' मुद्दा आता बॉलिवूडमध्ये गाजणार, 'Malaal Trailer' एकदा पाहाच

सलमाननं आजही जपून ठेवलाय ऐश्वर्यासोबतचा 'हा' फोटो, ब्रेकअपनंतर पहिल्यांदाच केला शेअर

First published: May 19, 2019, 10:45 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading